आपल्या स्टाइल आणि अभिनयाने कमी वयात यशाचे शिखर गाठणारी अभिनेत्री अनुष्का सेन (Anushka Sen) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनुष्का सेन आता लवकरच 'है जुनून' सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नील नितीन मुकेश चिडताना दिसत आहे. नेमकं घडलं का, जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) 'है जुनून' सीरिजमधून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. सीरिजच्या प्रमोशनल दरम्यानचा नील नितिन मुकेश आणि अनुष्का सेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हँडसम नील नितीन मुकेश ग्रे सूटमध्ये दिसत आहे. तर रेड गाऊनमध्ये अनुष्का सेन खूपच सुंदर दिसत आहे.
एका रुममधून अनुष्का सेन बाहेर येत होती. तेव्हा नील अनुष्काकडे बोट दाखवून तिला आता जाण्यास सांगतो. तेव्हा अनुष्का थोडी घाबरलेली दिसत आहे. नील नितीन मुकेश अनुष्का सेनवर रागवतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र अद्याप नील नितीन मुकेश अनुष्का सेनवर का चिढला आहे, याचे कारण समजले नाही आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'है जुनून' हा युथ सेंट्रिक म्युझिक ड्रामा असणार आहे. यात जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसत आहे. तसेच यात अनुष्का सेन, सिद्धार्थ निगम ही पाहायला मिळत आहेत. काल मुंबईत 'है जुनून' या म्युझिकल सीरिजच्या प्रमोशनसंबंधी एक इव्हेंट पार पडला. 'है जुनून' ही वेब सीरिज 16 मे ला जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. फक्त 22 वर्षांची अनुष्का सेनचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.