Operation Sindoor: नाना पाटेकरांचं कौतुकास्पद काम, 'त्या' कुटुंबांना केली लाखोंची मदत, ४८ शाळांचे घेतलं पालकत्व

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर हे एक उत्तम कलाकार असण्यासोबतच सामाजिक सेवेतही अमूल्य योगदान देतात. ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे शहिद किंवा जखमी झालेल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील ११७ कुटुंबांना मदत त्यांनी मदत केली आहे.
Nana Patekar
Nana PatekarSaam Tv
Published On

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर हे एक उत्तम कलाकार असण्यासोबतच सामाजिक सेवेतही अमूल्य योगदान देतात. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय सैन्याच्या सहकार्याने ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे शहिद किंवा जखमी झालेल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील ११७ कुटुंबांना मदत साहित्य आणि ४.२ दशलक्ष रुपये दान केले.

नाना पाटेकर यांनी या बाधित कुटुंबांना मदत करणे ही त्यांची जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले. सोमवारी पाकिस्तानी गोळीबारात बळी पडलेल्यांना मदत साहित्य वाटप करताना ते भावुक झाले. त्यांची स्वयंसेवी संस्था, निर्मला गजानन फाउंडेशनच्या वतीने, नाना पाटेकर यांनी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात्मक गोळीबाराचा फटका सहन करणाऱ्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोकांची भेट घेतली.

Nana Patekar
Katrina Kaif Pregnancy: कतरिना-विकीच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

नाना पाटेकरांनी कुटुंबांना ४.२ दशलक्ष रुपये दिले

नाना पाटेकर यांनी "प्रहार" चित्रपटात आर्मी मेजरची भूमिका साकारली होती. त्यांनी सांगितले की, पूंछमधील गोळीबारात अमरिक सिंग यांना गमावलेल्या ११ वर्षांच्या मुलीच्या शिक्षणासाठी ते वैयक्तिकरिता ते हा निधी देत ​​आहेत. ७ ते १० मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान कुटुंबातील सदस्य गमावलेल्या किंवा घरांचे नुकसान झालेल्या ११७ कुटुंबांना अभिनेत्याने ४२ लाख रुपयांची देणगी दिली.

Nana Patekar
71st National Film Awards: राष्ट्रपतींच्या हस्ते आज 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; 'या' कलाकारांचा होणार सन्मान

पहलगाम दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला. यामध्ये २६ लोक मृत्युमुखी पडले, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबार, क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ल्यात किमान २८ लोक मृत्युमुखी पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com