Ram Charan: रामचरणला साकारायची आहे ‘या’ भारतीय क्रिकेटपटूची भूमिका, ऑस्कर मिळाल्यानंतर व्यक्त केली इच्छा

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये अभिनेत्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
Ram Charan
Ram CharanSaam Tv

Ram Charan: या वर्षाचा ऑस्कर भारतासाठी खूपच खास होता. ऑस्कर २०२३ मध्ये भारताला दोन पुरस्कार मिळाले, त्यातील एक पुरस्कार नाटू नाटू गाण्यासाठी मिळाला होता. आपल्या गाण्याला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता राम चरण भारतात परतला आहे. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केले आहे. सोबतच त्याला एका खेळाडूच्या बायोपिकमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Ram Charan
महिलांची बदनामी केल्याप्रकरणी MC Stan ला मारहाण?, रागाच्या भरात शोच कॅन्सल; नक्की काय आहे प्रकरण

राम चरणच्या RRR चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये अभिनेता त्याच्या आवडत्या स्टार सलमान खानबद्दल बोलला. तसेच आपण दबंग खानचा चाहता असल्याची कबुली दिली आहे.

सलमानसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल रामचरण म्हणतो, “मी मुंबईत असताना मला भाईजानने भेटीसाठी बोलवलं होतं. त्याचा तो भेटीचा किस्सा मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी सलमानने माझे आदराने स्वागत केले होते.”

राम चरणला तुला अशी कोणाची भूमिका आहे, ती करायला आवडेल, तेव्हा अभिनेत्याने खुलासा केला की, मला एका क्रिकेट खेळाडूवर बायोपिक करायला खूप आवडेल, मी त्या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे. मोठ्या पडद्यावर मला विराट कोहलीची भूमिका साकारायला आवडेल. माझ्या अंदाजे, मला चान्स मिळाला तर मी नक्कीच संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल.

Ram Charan
Actor Lance Reddick: 'द वायर' आणि 'जॉन विक' मधील अभिनेता लान्स रेडिक यांचे निधन

त्याचवेळी मीडियाशी बोलताना राम चरण म्हणतो, “मी खूप आनंदी आहे. सर्वांचे आभार. एमएम कीरावानी, एसएस राजामौली आणि चंद्र बोस यांचा मला अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आम्हाला रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळाली आणि आम्ही ऑस्कर भारतात आणू शकलो. भारतात सर्वांनीच हा चित्रपट पाहिला. चित्रपटाला आणि ‘नाटू- नाटू’ गाण्याला प्रसिद्धी झोतात आणल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे मनापासून आभार. ‘नाटू- नाटू’ हे गाणे आमचेच नसून सर्व भारताचेच हे गाणे आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com