महिलांची बदनामी केल्याप्रकरणी MC Stan ला मारहाण?, रागाच्या भरात शोच कॅन्सल; नक्की काय आहे प्रकरण

स्टॅन सध्या भारत दौरा करत आहे. दौऱ्यादरम्यान त्याचे इंदूरमधील लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MC Stan Trolled
MC Stan TrolledSaam Tv

MC Stan: ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. स्टॅन सध्या भारत दौरा करत आहे. दौऱ्यादरम्यान त्याचे इंदूरमधील लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर बजरंग दलाने रॅपरला मारहाण करत धमकावल्याचे समजले आहे. जाणून घेऊया नक्की काय प्रकरण आहे.

MC Stan Trolled
Actor Lance Reddick: 'द वायर' आणि 'जॉन विक' मधील अभिनेता लान्स रेडिक यांचे निधन

‘बिग बॉस 16’ चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. १७ मार्च रोजी इंदूरमध्ये त्याचा शो होता. दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोंधळ घातला. उघडपणे एमसी स्टॅनच्या गाण्यांमध्ये महिलांचं वाईट चित्रण आणि आक्षेपार्ह्य विधान असल्याने बजरंग दलाने थेट स्टेजवर जात गोंधळ घातला. याशिवाय एमसी स्टॅन आपल्या गाण्यांमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, त्यामुळे आजची तरुणपिढी याच्या आहारी जात आहे, असा आरोप केला आहे.

MC Stan Trolled
Urfi Javed: स्त्रियांना फक्त मुलांना जन्म देणार यंत्र... भारतीय महिलांना आळशी म्हणणार्‍या सोनालीवर उर्फीची घणाघाती टीका

एमसी स्टॅनचे चाहते त्याला ट्विटरवर सपोर्ट करत आहेत. बजरंग दलाची कार्यकर्ते मंचावर कसे पोहोचले, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सुरक्षा दलातील पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जातो.

भारतात कलाकारांना मान मिळत नाही, असे अनेक युजर्सचे मत आहे. काही व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यात बजरंग दलाचे सदस्य एमसी स्टॅनला धमक्या देताना दिसत आहेत. एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

इंदूरनंतर १८ मार्चला नागपुरात एमसी स्टेनचा लाईव्ह शो आहे. त्यानंतर 40 दिवसांनी तो 28 एप्रिलला अहमदाबादमध्ये शो करणार आहे. दुसऱ्या दिवशी 29 तारखेला जयपूर, त्यानंतर 6 मे रोजी कोलकाता आणि 7 मे रोजी दिल्ली येथे त्यांचा लाइव्ह कॉन्सर्ट होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com