Actor Lance Reddick: 'द वायर' आणि 'जॉन विक' मधील अभिनेता लान्स रेडिक यांचे निधन

Lance Reddick dies: लान्स रेडिक यांनी वयाच्या ६० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
Lance Reddick
Lance ReddickInstagram @thereallancereddick

'John Wick' actor Lance Reddick dies: लान्स रेडिक हे द वायर, फ्रिंज आणि जॉन विकसह टीव्ही आणि चित्रपट अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. लान्स रेडिकच्या चाहत्यांसाठी एक वाईट आहे. लान्स रेडिक यांनी वयाच्या ६० व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याच्या निधन झाले आहे. लान्स रेडिक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काल म्हणजे शुक्रवारी पहाटे त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्याच्या पब्लिसिस्टने निवेदनाद्वारे ही माहिती सर्वांना सांगितले आहे. त्यांच्या मृत्यु हा नैसर्गिक आहे. त्याच्या निधनावर याशिवाय अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Lance Reddick
Urfi Javed: स्त्रियांना फक्त मुलांना जन्म देणार यंत्र... भारतीय महिलांना आळशी म्हणणार्‍या सोनालीवर उर्फीची घणाघाती टीका

रेडिक यांचा सहकलाकार वेंडेल पियर्सने ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले आहे, “एक महान शक्ती आणि देवाचा आशीर्वाद असलेला माणूस. तो जितका प्रतिभावान अभिनेता होता तितकाच उत्तम संगीतकार होता. रेडिकची स्तुती कर्तायन त्यांच्या अनेक आठवणींना वेंडेल यांनी उजाळा दिला आहे.

जॉन विक - चॅप्टर 4 चे दिग्दर्शक चॅड स्टेहेल्स्की आणि स्टार केनू रीव्हस म्हणाले की ते त्यांचा आगामी चित्रपट रेडिकला समर्पित करणार आहे. रेडिक यांच्या जाण्याने सगळेच अत्यंत दु:खी झाले आहेत.

द वायरचे दिग्दर्शक डेव्हिड सायमन यांनी ट्विटरवर रेडिकचे कौतुक करताना लिहिले, "एक परिपूर्ण व्यावसायिक, एक समर्पित सहकारी, एक प्रेमळ आणि समंजस माणूस, एक विश्वासू मित्र."

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com