Urfi Javed: स्त्रियांना फक्त मुलांना जन्म देणार यंत्र... भारतीय महिलांना आळशी म्हणणार्‍या सोनालीवर उर्फीची घणाघाती टीका

Sonali Kulkarni's Comments On Women: अभिनेत्री उर्फी जावेदने सोनलीवर राग व्यक्त केला आहे.
Urfi Javed Commented On Sonali Kulkarni
Urfi Javed Commented On Sonali Kulkarni Instagram

Urfi Javed Commented On Sonali Kulkarni: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा एक व्हिडिओ कालपासून बराच व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करत भारतीय बहुतांश महिला आळशी झाल्या आहेत, असे म्हटले होता. तिच्या या व्हिडिओवर आता सोशल मीडिया इन्फ्लून्सर आणि अभिनेत्री उर्फी जावेदने सोनलीवर राग व्यक्त केला आहे.

उर्फी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोल होत असते. हे कमी पडते कि काय म्हणून उर्फी अनेक वादात उडी घेत रोष ओढवून घेत असते. उर्फीने राजकीय नेत्या चित्र वाघ आणि अभिनेत्री कंगना रनौत यांना चांगलेच सुनावले होते. आता काहीही कारण नसताना उर्फीन सोनालीच्या कुलकर्णीच्या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

Urfi Javed Commented On Sonali Kulkarni
Bhalchandra Kulkarni: मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

उर्फीने सोनालीचा व्हिडिओ रिट्विट करत म्हटले आहे की, 'किती असंवेदनशील आहे, तू जे काही बोललीस ते! आधुनिक काळातील महिला त्यांचे काम तसेच घरातील कामे एकत्र सांभाळत असतानाही तुम्ही त्यांना आळशी म्हणता? चांगला कमावणारा नवरा हवा यात गैर काय?

शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलांना जन्म देणार यंत्र म्हणून पाहिले आणि हो लग्नाचे मुख्य कारण म्हणजे हुंडा. स्त्रियांनो विचारण्यास किंवा मागणी करण्यास घाबरू नका. होय तुमचे म्हणणे बरोबर आहे महिलांनी काम केले पाहिजे परंतु हा एक विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही. ते असू शकते हे पाहण्यासाठी तुम्ही खूप पात्र आहात.'

उर्फीच्या या ट्विटवर अनेक कमेंट येत आहेत. अनेक महिला तिचे समर्थन करत आहेत. तसेच या व्हिडिओ शेअर करणाया व्यक्तीने देखील कमेंट केली आहे अमी म्हटले तुमचीच कमतरता होती, तुम्ही या सगळ्याचा चुकीच्या पद्धतीने विचार करत आहात. असे त्याने म्हटले आहे.

उर्फीच्या या ट्विटवर अभिनेत्रीने सोनाली कुलकर्णीची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बहुदा हा व्हिडिओ तिने शेअर केला नसल्याने तिला याची कल्पना देखील नसेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com