Sudha Chandran Viral Video: जागरला गेलेल्या अभिनेत्रीच्या अंगात आली देवी; व्हिडिओ व्हायरल

Sudha Chandran: अभिनेत्री सुधा चंद्रन या प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांच्या अंगात देवी आल्याचे दिसत आहे. सुधा चंद्रन यांना अनेक लोकांनी पकडून धरलंय.
Sudha Chandran Viral Video
Actress Sudha Chandran in a viral moment from a Mata Ki Chowki event.saam tv
Published On
Summary
  • अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • माता की चौकी दरम्यानचा असल्याचा दावा

  • हा व्हिडिओ शूटिंगशी संबंधित नाही

अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात व्हिडिओमध्ये सुधा यांना अनेकांनी पकडून ठेवलंय. हा चित्रपट किंवा टीव्ही मालिकेच्या शूटिंगचा नाही तर माता की चौकी दरम्यान काढलेला व्हिडिओ आहे. प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या अंगात देवीचं वारं आलं असं म्हटलं दजात आहे. देवीच्या पूजेदरम्यान त्या विचित्र कृती करत होत्या.

Sudha Chandran Viral Video
माही-जय भानुशालीचा घटस्फोट, १४ वर्षांचा संसार मोडला; मुलगी तारा अन् दोन दत्तक अपत्य कोणासोबत राहणार?

अभिनेत्री सुधा यांची अवस्था पाहून त्यांच्या अंगात देवी आल्याचं अनेकजण म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये सर्वजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु उपस्थित असलेल्या सर्वांना तिला हाताळणे कठीण होताना दिसतंय. व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, सुधा चंद्रन यांनी पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. त्यांनी कपाळावर देवी माताच्या नावाची ओढणी बांधलीय. देवीच्या नावाचा जागर चालू होता. एकजण स्त्रीच्या वेशात देवीच्या नावाने जागर गोंधळ घालत आहे.

Sudha Chandran Viral Video
Santosh Juvekar Video : संतोष जुवेकरचा रॉयल अंदाज; नवीन वर्षात खरेदी केली लग्जरी कार, VIDEO शेअर करत म्हणाला- "देखोना guysss देखोना..."

त्यावेळी अभिनेत्री सुधा चंद्रन पूर्णपणे श्रद्धेत बुडालेल्या दिसत आहेत. वातावरण खूप धार्मिक झालं होतं. मातेच्या जागरमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक जमले होते. त्याच दरम्यान सुधा चंद्रन या विचित्र कृती करतात. त्यांचे वागणे पाहून अनेकांना धक्का बसतो. त्यांची कृती आणि वागणं अजिबात सामान्य वाटत नाही. अनेकजण अभिनेत्री सुधा चंद्रन यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात पण त्या हल्ला करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल की हे एखाद्या चित्रपटाचे किंवा टेलिव्हिजन मालिकेचे चित्रीकरण असेन. परंतु तसे नाही. हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com