'Naagin 7'मध्ये कोण बनणार इच्छाधारी नागिन? सोशल मीडियावर 'या' नावाची चर्चा

Who Is Main Lead Actress In Naagin 7 : सध्या सोशल मीडियावर 'नागिन 7'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'नागिन 7' च्या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे.
Who Is Main Lead Actress In Naagin 7
Naagin 7SAAM TV
Published On
Summary

'नागिन 7' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नागिन 7' मध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'नागिन 7' एकता कपूरचा शो आहे.

नुकताच 'नागिन 7' चा (Naagin 7) नवीन प्रोमो समोर आला आहे. यात शो च्या मुख्य अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर 'नागिन 7'मध्ये मुख्य भूमिकेत कोण असणार या चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीपासून टिव्हीच्या दोन मुख्य अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत. पहिली प्रियंका चाहर चौधरी आणि दुसरी ईशा मालवीय.'नागिन 7' हा ' एकता कपूरचा शो आहे.

प्रियंका चाहर चौधरी आणि ईशा मालवीय दोघीही बिग बॉस शोमध्ये झळकल्या आहेत. 'उडारियां'मधून प्रियंका चाहर चौधरीला खूप लोकप्रियता मिळाली. तर ईशा मालवीय अनेक शोमध्ये दिसते. तसेच तिचे म्युझिक अल्बमही खूप गाजतात. सोशल मीडियावर प्रियंका आणि ईशा चाहत्यांमध्ये भन्नाट चर्चा रंगली आहे. प्रियंका चाहर चौधरी महा-नागिनच्या भूमिकेत दिसेल असे बोले जात आहे. तर दुसरीकडे ईशा मालवीयाचे चाहतेही तिला नागिनच्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

'नागिन 7' कधी सुरू होणार?

'नागिन 7' नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "उठेगा तुफान, लिखी जायेगी नई दास्ता..." या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री नागिन रुपातून माणसाच्या रुपात येताना दिसत आहे. चाहते नवीन प्रोमोची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Who Is Main Lead Actress In Naagin 7
Salman Khan : अभिनेता सलमान खानवर पाकिस्तान चिडला; थेट दहशतवादी घोषित, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com