Mukkam Post Devach Ghar: 'मुक्काम पोस्ट देवाच घर' सिनेमाने रचला इतिहास; ठरला पहिला 5 भाषांमध्ये डब होणारा मराठी चित्रपट!

Mukkam Post Devach Ghar : 'मुक्कम पोस्ट देवाच घर' हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील मायरा वायकूळ या बाल अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Mukkam Post Devach Ghar
Mukkam Post Devach GharSaam Tv
Published On

Mukkam Post Devach Ghar: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट "मुक्कम पोस्ट देवाच घर" हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला असून मराठी चित्रपट बनला आहे. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.

कीमाया प्रॉडक्शन्स निर्मित आणि निर्माते महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठी भाषेत जेव्हा आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, अभिप्राय याचा विचार करून आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा ही कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी अशी आहे. ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आणि घरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे चित्रपटाचे निर्माते म्हणाले.

Mukkam Post Devach Ghar
Raid 2 Box Office Collection: 'रेड 2'नं मोडलं 'सिकंदर' अन् 'केसरी 2' चं रेकार्ड; रविवारी केली 'इतक्या' कोटींची कमाई

निरागसतेने भरलेला ही एक मार्मिक कथा आहे. "मुक्कम पोस्ट देवाच घर" या चित्रपटाने त्याच्या मूळ मराठी स्वरूपात आधीच प्रेक्षकांची मने जिंकले आहे. आकर्षक कथा, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर रिलीजची योजना सुरू असल्याची देखील टीमने स्पष्ट केले आहे.

Mukkam Post Devach Ghar
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड चोर आहे...; नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल करत केला मोठा आरोप

मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com