Pathaan Controversy: 'पठान' चित्रपटावर मुकेश खन्ना संतापले, म्हणाले 'ही थेरं भारतात चालणार नाही'
Mukhesh Khanna On Pathaan Movie: शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या 'पठान' चित्रपटाची सर्वांना बरीच प्रतीक्षा होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येत आहे तसे या चित्रपटाविषयीचे वाद वाढत आहेत. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाच्या कपड्यांवरून सुरू झालेला गदारोळ अजून वाढत चालला आहे.
'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित होताच अनेक वादांना तोंड फुटले. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला. भगवा रंग हा हिंदू धर्माचा रंग आहे, या रंगाचे कपडे घालून असे सीन चित्रपटामध्ये दाखवू शकत नाही, असे म्हणत अनेकजण या चित्रपटावर टीका करत आहेत. आता या टीका करणाऱ्यांमध्ये अभिनेते मुकेश खन्ना यांची भर पडली आहे. (Deepika Padukone)
मुकेश खन्ना यांनी 'बेशरम रंग' या गाण्यावर संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी दीपिका आणि शाहरुख खानचे हे गाणे अश्लील असल्याचे म्हणत या गाण्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, 'लहान मुले आता टीव्ही आणि चित्रपट बघत मोठी होत आहेत. म्हणूनच सेन्सॉर बोर्डाने अशा गाण्यांना पास करू नये.' मुकेश खन्ना यांनी सेन्सॉर बोर्डवरही प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, 'सेन्सॉर बोर्ड सुप्रिम कोर्ट नसून त्याचा नक्कीच विरोध केला जाऊ शकतो.' (Shah Rukh Khan)
'आपला देश स्पेन नाही, त्यामुळे अशी गाणी बनवू नका. आता अर्ध्या कपड्यांमध्ये गाणी बनत आहेत. उद्या बिना कपड्यातही गाणी बनतील. गाणे बनवणाऱ्यांना माहित नाही का भगवा रंग धर्म आणि संप्रदायासाठी महत्वाचा आहे. हे खूप संवेदनशील आहे, ज्याला आपण भगवा म्हणतो तो शिवसेनेचं झेंडा अणे आणि माच्या 'आरएसएस'चा पण. जा गाणे बनवणाऱ्यांना हे माहित आहे तर त्यांनी असे का केले? अमेरिकेत त्यांच्या झेंड्याच्या रंगाची बिकनी घालू शकतात. पण भारतात नाही.'
'पठान' चित्रपट २५ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटविषयीचे वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. शाहरुख खान आणि दीपिका यांनी टीका करणाऱ्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खान या चित्रपटाच्या माध्यमातून ४-५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपटावर केल्या जाणाऱ्या टीकांचा चाहत्यांनावर परिणाम होईल का हे आपल्याला लवकरच समजेल. (Movie)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.