India's Richest Person: मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. यावर्षी त्यांची एकूण संपत्ती ९.५५ लाख कोटी इतकी आहे. ही यादी M3M इंडिया आणि Hurun Research Institute ने संयुक्तपणे जाहीर केली आहे. गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब ८.१५ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच बॉलिवूडच्या किंग खानचे या यादीत समावेश झाला आहे.
या यादीत नवीन नोंदी
या वर्षीच्या यादीत नवीन नोंदी झाली आहे. रोशनी नादर मल्होत्रा आणि त्यांचे कुटुंब २.८४ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की "नवीन नोंदी भारतातील संपत्तीचे चित्र बदलत आहेत."
भारतात अब्जाधीशांची संख्या झपाट्याने वाढत आहे
अहवालानुसार, भारतात आता ३५० हून अधिक अब्जाधीश आहेत, १३ वर्षांपूर्वीच्या यादीच्या तुलनेत सहा पटीने वाढले आहे. सर्व अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती १६७ लाख कोटी आहे, जी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) जवळपास निम्मी आहे.
तरुण आणि नवीन पिढीतील अब्जाधीश
पर्प्लेक्सिटीचे संस्थापक ३१ वर्षीय अरविंद श्रीनिवास या वर्षी भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत, त्यांची एकूण संपत्ती २१,१९० कोटी आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान देखील पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे, त्याची एकूण संपत्ती अंदाजे १२,४९० कोटी आहे. निरज बजाज आणि त्यांच्या कुटुंबाने यावर्षी संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे, त्यांची संपत्ती ६९,८७५ कोटींवरुन २.३३ लाख कोटींवर पोहोचले आहे. या वर्षीच्या यादीत १०१ महिलांचा समावेश आहे. एकूणच, भारतात संपत्ती निर्मितीचे मुख्य चालक स्वयंनिर्मित व्यक्ती आहेत. यादीतील ६६% लोक स्वयंनिर्मित आहेत आणि ७४% नवीन नोंदींनी स्वतः संपत्ती निर्माण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.