vijay and dhoni
vijay and dhonicanva

GOAT: अब मजा आयेगा..विजय थालापतीच्या चित्रपटात 'थाला'ची एन्ट्री

GOAT:साऊथ सुपरस्टार विजय थालापती याचा 'GOAT'हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळताना दिसतेय. या चित्रपटामध्ये भारताच्या कॅप्टन कुल म्हणजेच एम. एस धोनी यानी केमिओ करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
Published on

साउथ सुपरस्टार विजय थालापथीचा GOAT चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील विजयच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक(appreciation) होत आहे. चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे क्रिकेटर एम एम धोनीची झलक. चित्रपटामध्ये एम एस धोनीने केमिओ केला आहे.

विजय थालापती आणि एम एस धोनी या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात खूप नाव कमावले आहे. या दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. चित्रपटातील एम एस धोनीचा केमिओ हे प्रेक्षकांसाठी मोठी सरप्राईज होते.

एम एस धोनीचा हा केमिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. दोन्ही दिग्गज व्यक्तीमत्त्व एका पडद्यावर पाहता येणार असल्याने प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली आहे. चित्रपटाबाहेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट आवर्जुन पाहत आहेत.

विजय थालापथीबद्दल बोलायचे तर, विजय हा टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नुकताच स्वतः चा वेगळा पक्षदेखील स्थापन केला आहे. त्यामुळे आता विजय राजकारणातदेखील उतरणार आहे. महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचे झाले तर, एम एस धोनीच्या उत्तम कामगिरीने क्रिकेटप्रेमींना वेड लावले आहे.

vijay and dhoni
Stree 2 : श्रद्धाच्या चित्रपटातील खरी 'स्त्री' कोण? चेहऱ्यावरील पदराआड कोणता चेहरा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com