Actress Harassment: आधी कंबरेला स्पर्श, मग अश्लील हावभाव केले...; कार्यक्रमातच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृत्य, काय घडलं?

Mouni Roy Harassment: अभिनेत्री मौनी रॉयने एक अतिशय दुःखद घटना शेअर केली आहे. तिने स्पष्ट केले की, हरियाणामध्ये एका कार्यक्रमात काही पुरूषांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला चुकिच्या पद्धतीने स्पर्श केला आहे.
Mouni Roy Harassment
Mouni Roy HarassmentSaam tv
Published On

Mouni Roy Harassment: अभिनेत्री मौनी रॉयने तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेची माहिती शेअर केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की हरियाणातील करनाल येथे एका कार्यक्रमात काही लोकांनी तिच्याशी असभ्य वर्तन केले. तिने असेही उघड केले की एका वयस्कर पुरुषासह काही उपस्थितांनी अश्लील हावभाव केले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मौनीने तिच्या पोस्टमध्ये काय उघड केले ते जाणून घेऊयात

मौनीसोबतचे असभ्य वर्तन

मौनीने सांगितले की एका कार्यक्रमात एका वयस्कर पुरुषाने फोटो काढण्याच्या बहाण्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पोस्टमध्ये मौनीने लिहिले आहे की, "माझा शेवटचा कार्यक्रम करनालमध्ये झाला होता आणि तिथल्या पाहुण्यांमध्ये दोन वृद्ध लोकांच्या वागण्याने मला खूप दुःख झाला. कार्यक्रम सुरू होताच मी स्टेजकडे जाता होते, त्या वयस्कर पुरुषाने आणि तिथे उपस्थित असलेल्या काही कुटुंबातील सदस्यांनी फोटो काढण्यासाठी माझ्या कंबरेवर हात ठेवले. जेव्हा मी त्यांना म्हणालो, 'सर, कृपया तुमचा हात काढा,' तेव्हा त्यांना ते आवडले नाही."

Mouni Roy Harassment
Famous Singer Death: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

"स्टेजवर तर आणखी वाईट परिस्थिती होती. माझ्या समोर दोन काका उभे होते, ते अश्लील कमेंट्स करत होते आणि अश्लील हावभाव करत होते. जेव्हा मला हे कळले तेव्हा मी त्यांना हळूवारपणे इशारा केला की करू नका, पण प्रत्युत्तरात त्यांनी माझ्यावर गुलाब फेकायला सुरुवात केली. मी परफॉर्मन्स करताना स्टेज सोडून जाणार होते, पण मी माझा परफॉर्मन्स संपवला."

Mouni Roy Harassment
Palash Muchhal: सांगलीच्या अभिनेत्याचा ४० लाखांच्या फसवणुकीचा आरोप, पलाश मुच्छलची कोर्टात धाव, वाचा नेमकं प्रकरण काय?

मौनी म्हणाली, "मला खूप अपमानित आणि भीती वाटते. मला वाटते की अधिकाऱ्यांनी या गैरवापरावर कारवाई करावी." आम्ही कलाकार आहोत जे आमच्या कलेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो.हे लोक तेव्हा काय करतील जर त्यांच्या मित्रांनीच त्यांच्या मुली, बहिणी किंवा कुटुंबातील सदस्यांशी असे वागवले तर? त्यांना लाज वाटली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com