Shraddha Dubey: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे व्यावसायिक शिव शर्मा याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मॉडेल आणि ब्लॉगर श्रद्धा दुबे तसेच तिची बहीण रश्मी यांचा आता पोलीस तपास करत आहेत. शिवचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आणि महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण आणि आरोपीचा तपास सुरु आहे.
श्रद्धाच्या फ्लॅटमधून संशयास्पद वस्तू जप्त
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासोबत श्रद्धाच्या फ्लॅटची तपासणी केली. यावेळी तेथून विविध अमली पदार्थ, लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे आणि औषध मिळाली. पोलिसांनी अवध ग्रीन अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये शिव खाली पडताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे; मात्र, त्यापूर्वी फ्लॅटमध्ये किंवा वरच्या मजल्यावर काय घडले, याचा पोलिस शोध घेत आहे.
कॉल रेकॉर्डमध्ये हाईप्रोफाइल लोकांची नावं
तपासादरम्यान श्रद्धा आणि रश्मी यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड्समध्ये २० हून अधिक व्यक्तींचे नंबर मिळाले आहे. यामध्ये बिझनेसमॅन, बिल्डर्स आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तसेच, श्रद्धा काही व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एका बिझनेसमॅनकडून २५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप समोर आला आहे.
शिवाच्या आईचे गंभीर आरोप
शिवची आई रंजना यांनी श्रद्धा, रश्मी आणि अन्य आरोपींविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलाला खोट्या प्रकरणांत अडकवणे, मारहाण करणे आणि धमक्या देणे, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. तसेच शिव आणि श्रद्धा गेल्या वर्षभरापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर पीएम रिपोर्टमधून शिवाच्या शरीरावर मृत्यूपूर्वी १० जखमा झाल्याचे समोर आले आहे. अंतर्गत रक्तस्राव हे त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या पोलीस श्रद्धा आणि इतर संशयितांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.