स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिका सुरू होत आहे.
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर मालिकेत झळकणार आहे.
मधुराणी मालिकेत सावित्रीबाईंची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे.
'स्टार प्रवाह' वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची आवडती 'अरुंधती' येणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने 'अरुंधती' ची भूमिका साकारली होती. तिला या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. आता एका ऐतिहासिक भूमिकेत मधुराणी झळकणार आहे.
मधुराणी 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule ) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. अद्याप मालिकेची वेळ जाहीर केली नाही.
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर झळकणार आहे. तर डॉ. अमोल कोल्हे हे महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणार आहेत. मालिकेत अजून अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच अमोल कोल्हे यांची जगदंब क्रिएशन्स ही संस्था मालिकेची निर्मिती करणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी खूप वर्षांनंतर टिव्हीवर जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यामुळे चाहते त्यांना पाहायला खूपच उत्सुक आहेत. 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेतून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनाचा संघर्ष जवळून पाहायला मिळणार आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री सक्षम करण्यासाठी, स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट मालिकेतून पुन्हा एकदा जगासमोर येणार आहेत. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका पोहचवणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.