
काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या पहिल्या वहिल्या इंग्रजी चित्रपट "करेजच" सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये स्क्रिनिंग पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं ! संस्कृती उत्तम कलाकार आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तिच्या अभिनयाची भुरळ अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना पडली आहे आणि तिच्या कामाचं कौतुक देखील झालं.
विशेष म्हणजे संस्कृती ही पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवल मध्ये भारताच प्रतिनिधित्व केलं आहे म्हणून हा फिल्म फेस्टीवल संस्कृती साठी अगदीच खास आहे.
संस्कृतीचा या फिल्म फेस्टीवल बद्दलचा अनुभव सोशल मीडिया वर शेयर करताना संस्कृती म्हणाली " करेज ला तुम्ही खूप प्रेम दिलं आणि हसऱ्या चेहऱ्याने आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू आणून हा चित्रपट तुम्ही खास केलात आणि यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे. हे जे काही घडलं ते खूप सुंदर आणि अनपेक्षित आहे म्हणून याचा आनंद आहे तुम्हाला आमची कलाकृती आवडली आणि तुम्ही ती आपलीशी केली. आभार मानावे तितके कमीच आहेत पण हा समृद्ध संपन्न करणारा अनुभव खूप कमालीचा होता"
संस्कृती तिच्या अभिनयाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे पण तिच्या या इंग्रजी चित्रपटाने पू हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. जगभरात संस्कृतीच्या "करेज" या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे हे बघण देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.