Good Vibes Only Release On OTT: आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी ‘गुड वाईब्स ऑन्ली’, लवकरच होणार प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित

Good Vibes Only Film: आयुष्यातील सकारात्मकता आणणारी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Good Vibes Only Release Planet Marathi OTT
Good Vibes Only Release Planet Marathi OTTInstagram
Published On

Good Vibes Only Release Planet Marathi OTT: ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Good Vibes Only Release Planet Marathi OTT
Big Relief To Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने एनसीबीची याचिका स्वीकारली

यापूर्वी आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी आपल्या जादुई आवाजाची भुरळ श्रोत्यांना घातली आहे आता आपल्या उत्तम अभिनयाने ते प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘गुड वाईब्स ऑन्ली’ची कथाही जुगल राजा यांचीच आहे. दोन व्यक्तिंभोवती फिरणारी ही कथा सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतलेली आहे. आता यात नेमकं काय पाहायला मिळणार हे वेबफिल्म आल्यावरच कळेल. परंतु नावावरून आणि पोस्टरवरून तरी यात काहीतरी उत्सुकता वाढवणारं पाहायला मिळणार हे नक्की !

या वेबफिल्मबद्दल दिग्दर्शक जुगल राजा म्हणतात, “आपल्या आजुबाजुला सतत चांगल्या लहरींचा प्रवाह असेल तर आपले आयुष्य आपसुकच सकारात्मक होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या वेबफिल्ममध्ये केला आहे आणि यासाठी आम्हाला प्लॅनेट मराठीची साथ लाभली आहे. याहून चांगलं काही असूच शकत नाही. मला खात्री आहे, हा विषय प्रेक्षकांना आवडेल.”

Good Vibes Only Release Planet Marathi OTT
Baipan Bhaari Deva 20th Day Collection: बॉक्स ऑफिसवर ‘बाईपण भारी देवा’ सुसाट, रितेश-जेनेलियाच्या 'वेड'चाही रेकॉर्ड लवकरच मोडणार

तर प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “आम्ही नेहमीच प्रेक्षकांना वेगवेगळे विषय दिले. या वेबफिल्मची संकल्पनाही खूप वेगळी आहे. सर्फिंग या विषयावर चित्रपट बनू शकतो, ही संकल्पनाच मुळात मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये आपण हा विषय अनेकदा पाहिला आहे. प्रथमच हा विषय मराठी चित्रपटात हाताळण्यात आला आहे.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com