Ajit Bhagat Passes Away: चालते बोलते नाट्यविद्यापीठ हरपले; जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत काळाच्या पडद्याआड

Ajit Bhagat: प्रायोगिक नाटकाचे हे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून आज गेले आहेत.
Ajit Bhagat Passes Away
Ajit Bhagat Passes AwaySaam TV
Published On: 

Ajit Bhagat Died Due to Heart attack: जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचे आज पहाटे 3 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनाच्या वेळी ते त्यांच्या घरीच होते.

अजित भगत म्हणजे ऍब्सर्ड आणि ऍब्स्ट्रॅक्ट शैलीचा लिलया वापर करीत नाटक 'जगणारे रंगधर्मी'. चालते बोलते 'नाट्यविद्यापीठ'. प्रायोगिक नाटकाचे हे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून आज गेले आहेत.

Ajit Bhagat Passes Away
Parveen Babi Journey: बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त परवीन बाबीचा जीवनप्रवास

'आर्य चाणक्य', 'जांभूळ आख्यान', 'सगेसोयरे', 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचं मूल', 'मुंबईचे कावळे', 'जय जय रघुवीर समर्थ', 'झाला अनंत हनुमान', 'अरण्य-किरण' अशी प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके अजित भगत यांनी दिग्दर्शित केली.

दिग्दर्शनासोबतच अभिनयात देखील चांगले नाव कमावले. 'मॅड मॅड मर्डर', 'एक वाडा झपाटलेला' इत्यादी मालिका तसेच विशेष उल्लेखनीय म्हणजे पंडित सत्यदेव दुबेजीच्या 'इसापचा गॉगल' या नाटकातील अजित यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

'कंपनी' , 'मुंबई मेरी जान' अशा हिंदी चित्रपटांमधेही सरांनी अभिनय केला आहे. अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित अजित भगत हे प्रयोगशील व्यक्तीमत्व अकाली जाणे हे रंगभूमीचे भरून न येणारे नुकसान आहे.

अजित भगत यांची आज सकाळी 10 वाजता अंतिम यात्रा निघाली. मुंबईतील कांदिवली येथे ते वास्तव्यास होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.