Marathi Television Serial: कोकणची चेडू दिसणार नव्या भूमिकेत, ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’मालिकेत साकारणार प्रमुख भूमिका

Kshetrapal Shri Dev Vetoba Serial: सन टीव्ही वाहिनीवर श्री देव वेतोबाची कथा मांडणारी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Kshetrapal Shri Dev Vetoba In Prajakta Wadaye
Kshetrapal Shri Dev Vetoba In Prajakta WadayeSaam Tv
Published On

Kshetrapal Shri Dev Vetoba In Prajakta Wadaye: ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेली सन टीव्ही नेटवर्कची ‘सन मराठी’ वाहिनी गेली दोन वर्षे वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून, मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही वाहिनी आणि प्रेक्षकवर्ग यांच्यातील नातं आता अतूट आहे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना जिव्हाळ्याची वाटते आणि आता यामध्ये श्री देव वेतोबाची कथा मांडणारी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही आणखी एक नवी मालिका सहभागी होत आहे. १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Kshetrapal Shri Dev Vetoba In Prajakta Wadaye
Neena Gupta France Vacation: नीना गुप्ताची फ्रान्स ट्रिप ठरलीये खास, पतीसोबत मौजमजा; 64 वर्षीय अभिनेत्रीची लाइफस्टाइल बघून नेटकरी भारावले

श्री देव वेतोबाची गोष्ट अनुभवयाला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असतीलच, पण नव्या मालिकेच्या माध्यमातून कलाकारांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळण्याचा आनंदही त्यांना होत असतो. अभिनेता उमाकांत पाटील हा या मालिकेचा प्रमुख चेहरा आहे जो ‘वेतोबा’ची भूमिका साकारणार आहे. पण त्यासह, आणखी कोणते कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली असतानाच आणखी एका प्रमुख पात्राची ओळख वाहिनीने करुन दिली आहे.

मालवणी भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणारी, कोकणचा चेडू आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत प्राजक्ता ‘बायो’ या पात्राच्या भूमिकेत दिसेल. प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांत काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की प्राजक्ता हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेतील प्राजक्ताचं ‘बायो’ हे मालवणी पात्रं देखील लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. आता बायो हे पात्रं सकारात्मक आहे की नकारात्मक याचा अंदाज प्रेक्षकांना येईलच, पण हे मात्र नक्की की, प्राजक्ताच्या या भूमिकेमुळे मालिकेचे प्रत्येक भाग रंजक वळणावर पोहोचणार आहेत. (Entertainment News)

Kshetrapal Shri Dev Vetoba In Prajakta Wadaye
Baipan Bhari Deva Raj Thackeray Connection : राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंचं ‘बाईपण भारी देवा’सोबत खास कनेक्शन; दिग्दर्शकांनीच शेअर केला किस्सा

‘सोमिल क्रिएशन’ प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले असून निलेश मयेकर यांनी कथा लिहिली आहे तर राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत. येत्या १७ जुलैपासून “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सन मराठी या चॅनलवर पाहता येणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com