Anurag Worlikar Engagement: 'पोर बाजार' फेम अभिनेत्याने केला साखपुडा, कपलचे क्युट फोटो आले समोर

Por Bazaar Fame Actor Anurag Worlikar: अभिनेता अनुराग वरळीकरचा साखरपुडा पार पडला. अनुरागच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Anurag Worlikar Engagement
Anurag Worlikar EngagementSaam Tv
Published On

Anurag Worlikar Engagement Photos:

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अभिनेता प्रसाद जवादेचा (Prasad Jawade) लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता या कपलनंतर मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढणार आहे. नुकताच अभिनेता अनुराग वरळीकरचा (Anurag Worlikar) साखरपुडा पार पडला. अनुरागच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेता अनुराग वरळीकर लवकरच जवळची मैत्रिण पायल साळवीसोबत लग्न करणार आहे. नुकताच या कपलचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला अनुराग आणि पायल यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र परिवाराने हजेरी लावली. अनुरागने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्यांतील आनंदी क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अनुरागने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंमध्ये तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट सूटमध्ये दिसत आहे. तर त्याची होणारी पत्नी पायलने ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला आहे. दोघेही या फोटोंमध्ये खूपच क्युट दिसत आहे. अनुरागने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'Here's to an endless adventure' असं लिहिलं आहे. अनुरागच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Anurag Worlikar Engagement
Ranbir Kapoor ने 'ॲनिमल'च्या ट्रेलर लाँचवेळी Rashmika Mandanna ला कोपरा का मारला?, VIDEO होतोय व्हायरल

अनुराग वरळीकरने 'देवकी' चित्रपटात बालकाराच्या भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. अनुरागने आतापर्यंत 'पोर बाजार', 'मिशन चॅम्पियन', 'निवडुंग' आणि 'बारायण' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटच नाही तर मालिकांमध्ये देखील अनुरागने काम केले आहे. 'दे धमाल' या मालिकेमध्ये त्याने बालकलाकाराची जबरदस्त भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या माध्यमातून तो घराघरामध्ये पोहचला. तर काही दिवसांपूर्वी अनुरागने 'डॉक्टर डॉन' या मालिकेत काम केले होते.

Anurag Worlikar Engagement
Jhimma 2: 'माझा बाबा गेल्यावर माझ्या आईला...', 'झिम्मा २'मधील या डायलॉगचा सिद्धार्थ चांदेकरच्या खऱ्या आयुष्याशी काय आहे संबंध?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com