Pani Puri New Marathi Movie Poster Out
Pani Puri canva

Pani Puri Movie: लज्जतदार नात्यांची चटकदार 'पाणीपुरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार...

Pani Puri New Marathi Movie Poster Out: नात्यांच्या विविद्ध चविंची चटकदार पाणीपुरी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
Published on

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं त्यासोबतच मनाला त्याची चव घेण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. लेखन-दिग्दर्शन रमेश चौधरी आणि एस.के प्रॉडक्शन निर्मित ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पाणीपुरी’ हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती संजीवकुमार अग्रवाल यांनी केली असून चंद्रकांत ठक्कर आणी अनिकेत अग्रवाल या चित्रपटाचे सहनिर्माते आहात.

Pani Puri New Marathi Movie Poster Out
Pani Movie: मराठवाड्याच्या 'जलदूत'चा संघर्षमय प्रवास 'पाणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर...

प्रत्येक नात्याची स्वतःची काही ना काही गोष्ट असते. त्या गोष्टीमध्ये कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी कथा असते. तर कधी दुःख घेऊन येणारी.अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट लवकरचं प्रेक्षकांच्या भटीला ‘पाणीपुरी’ हा चित्रपट मनोरंजन करण्यासाठी येत आहे. मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते यांच्या सारखे दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे संगित संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिले आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचा आवाज लाभला आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

Pani Puri New Marathi Movie Poster Out
Adinath Kothare-Urmila Kothare: झोपेतून उठला अन् पाहता क्षणी प्रेमात पडला ;अशी आहे आदिनाथ कोठारे-उर्मिलाची लव्हस्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com