Pani Movie: मराठवाड्याच्या 'जलदूत'चा संघर्षमय प्रवास 'पाणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर...

Hanumant Kendre Struggle Story: मराठवाड्याचा 'जलदूत' हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षमय जिवनावर आधारित 'पाणी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे याने मुख्य भूमिका साकारली आहे.
Pani Movie Hanumant Kendre Struggle Story:
Pani Moviecanva
Published On

मराठवाड्यातील 'जलदूत' हनुमंत केंद्रे यांच्या आयुष्यावर प्रेरित आणि सत्य घटनेवर आधारित 'पाणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पाणी' चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'पाणी' या चित्रपटाच्या टीमने गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राज्याचे दर्शन घेत पाणी चित्रपटाचा टीझर लॉंच केला.

'पाणी' चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांना हनुमंत केंद्रे या महान व्यक्तींचं आयुष्य जवळून जाणून घेण्यास मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारेने केलं आहे. या चित्रपटामध्ये रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील या सर्व कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

Pani Movie Hanumant Kendre Struggle Story:
Adinath Kothare : बँकेचे हफ्ते थकले अन् मुंबईत बेघर झालो...; आदिनाथ कोठारेने सांगितला कुटुंबावर ओढावलेला वाईट काळ

हनुमंत केंद्रेंची संघर्ष गाथा:

मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. या भागातील गावकरी गाव सोडून जात असताना हनुमंत केंद्रे हा तरुण त्या गावामध्ये राहून गावकऱ्याना पाणीपुरवठा करण्यासाठी मदत करतो. हनुमंत यांचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि कठीण होता. गावामध्ये पाणी नाही म्हणून अनेकांची लग्न देखील झालं नव्हतं. हनुमंत यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हनुमंत केंद्रे हा चेहरा अवघ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचला आहे. परंतु त्यांच्या आयुष्यातील खडतर संघर्ष निर्मात्यांना प्रेक्षकांच्या समोर आणायचे आहे. या चित्रपटाचीसह निर्माती बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता अमिर खान देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे निर्माती प्रियांता चोप्रा म्हणाली की,"पर्पल पेबल पिक्चर्सच्या माध्यमातून आम्हाला राज्यातील आणि देशातील गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पाणी हा चित्रपट आमच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटामधील कथा अनेक प्रेक्षकांना नक्कीच प्रेरीत करेल याची आम्हाला आशा आहे." प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये त्यांची प्रेमकहाणी देखील पाहायला मिळत आहे. आता हनुमंत यांची प्रेम कहाणी पूर्ण होईल का? गावामध्ये पाणी आणण्यासाठी हनुमंत यांनी केलेल्या कष्टाला फळ मिळेल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळेल.


Edited By: Nirmiti Rasal

Pani Movie Hanumant Kendre Struggle Story:
Adinath Kothare-Urmila Kothare: झोपेतून उठला अन् पाहता क्षणी प्रेमात पडला ;अशी आहे आदिनाथ कोठारे-उर्मिलाची लव्हस्टोरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com