मराठी अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) आपल्या हटके स्टाइलने चाहत्यांना वेड लावले आहे. 'टाइमपास' या चित्रपटाने त्याला खूप लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील दगडू हे पात्राने चाहत्यांच्या मानत घर केले आहे. आता पुन्हा एकदा प्रथमेश परब चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar ) यांची प्रमुख भूमिका असलेला 'मुंबई लोकल' (Mumbai Local Movie ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रथमेश परबच्या या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पहिल्यांदा पाहायला मिळमार आहे. 'मुंबई लोकल' हा चित्रपट 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
'मुंबई लोकल ' या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेम कहाणी मांडण्यात आली आहे. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा हटके चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तर ज्ञानदाच्या सख्या रे, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे आणि ठिपक्यांची रांगोळी अशा मालिका गाजल्या आहेत. तसेच तिने चित्रपटही काम केले आहेत. आता मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हलकीफुलकी प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
'मुंबई लोकल ' या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. यांच्यासोबत मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.