Mi Pathishi Ahe : 'मी पाठीशी आहे' चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर

Marathi movie Mi Pathishi Ahe Release Date : मराठी चित्रपट 'मी पाठीशी आहे' ची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर असल्याचे दिसत आहे.
Marathi movie Mi Pathishi Ahe Release Date
Mi Pathishi AheSAAM TV
Published On

2025 मध्ये नव्या चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळत आहे. यंदा प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन होणार आहे. श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' (Mi Pathishi Ahe) चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्याने 28 मार्चला होणारे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. या विलंबामुळे निर्माते आणि संपूर्ण टीमला आर्थिक नुकसान तसेच मानसिक ताण सहन करावा लागला.

'मी पाठीशी आहे' या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डकडून सर्टिफिकेट दिले असून चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. 'मी पाठीशी आहे' चित्रपट 4 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात 'मी पाठीशी आहे' चित्रपटाची कथा कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, अरुण नलावडे, सुहास परांजपे, अश्विनी चवरे, सतीश पुळेकर, शितल सोनावणे , प्रसाद सुर्वे असे हटके कलाकार पाहायला मिळणार आहेत.

 'मी पाठीशी आहे'
'मी पाठीशी आहे'

'मी पाठीशी आहे' चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. 'मी पाठीशी आहे' हा चित्रपट स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांवर आधारित असून त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक प्रेरणादायी प्रवास ठरेल. चित्रपटात सक्षम कुलकर्णी भूमिकेत दिसत आहे. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटात अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.

Marathi movie Mi Pathishi Ahe Release Date
Mumbai Local Movie Release Date : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! प्रेमाने खच्चून भरलेली 'मुंबई लोकल' स्थानकावर येत आहे, चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com