
Baaplyok Official Trailer Out: बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं.चित्रपटांमधून फारसं न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा याचित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
अल्पावधीतच या ट्रेलरने वनमिलियन व्ह्यूज टप्पा गाठला आहे. ट्रेलर आणि चित्रपटातील ' उमगाया बाप रं' हे गीतसध्या ट्रेंडिंगला आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून रिंगण, कागर, सोयरीक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘बापल्योक’ चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय.
आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणाऱ्या बापाने अजून जोरात पळायला हवे, असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असत. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. ‘बापल्योक’च्या ट्रेलर मधून हाच प्रवास अधोरेखित होतोय.
‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलनआशय गाताडे यांचे आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, ‘बाप लेकाच्यानात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच अंतर्मुख करेल. मकरंदने आजवरच्या त्याच्या चित्रपटांमधून नात्यांचे पैलू उलगडून दाखविले आहेत. या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला.त्याचा आजवरचा हा सर्वात उत्तम चित्रपट असून ‘बापल्योक’ चित्रपटातीलवडिल मुलाच्या नात्याला हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका चांगल्या कलाकृतीसाठी आम्ही एकत्र आलो असून ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रत्येकाला उत्तम जीवनानुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.