Independence Day 2023 Special Movies: सिनेस्टारची देशाला मानवंदना! अनेक चित्रपटातून व्यक्त केले देशप्रेम
Bollywood Actors Who Played The Characters Of Indian Genius:
सध्या भारतात ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत भारतीयांचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमरच्या आयुष्यावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. १५ ऑगस्टला प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना असते. चला तर जाणून घेऊया देशभक्तीपर वेबसीरिज आणि चित्रपटाबद्दल
रॉकेट बॉईज (Rocket Boys)
रॉकेट बॉईज (Rocket Boys) या वेबसीरीजमध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांच्या जीवनावर कथा चित्रित करण्यात आली आहे. या वेबसीरीजमध्ये भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणामध्ये त्यांचे योगदान दाखवण्यात आले आहे. (Bollywood Film)
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect)
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Nambi Effect) चित्रपटाची कथा भारतीय वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे, चित्रपटात नंबी नारायणन यांची भूमिका आर माधवनने साकारली आहे.
मिशन मंगल (Mission Mangal)
मिशन मंगल (Mission Mangal) हा भारतातील पहिला आंतरग्रहीय मोहिमेवर आधारित चित्रपट आहे. अनेक मोहिमांमध्ये सहभागी असलेले अनेक वैज्ञानिकांचे देखील पात्र चित्रपटात दिसते. अक्षय कुमारने मिशन मार्सचे वैज्ञानिक आणि दिग्दर्शक राकेश धवन यांची भूमिका साकारली आहे. जो वास्तविक जीवनातील शास्त्रज्ञ सुब्बय्या अरुणन यांच्यावर आधारित होता. विद्या बालनने तारा शिंदे या महिला वैज्ञानिकाची भूमिका साकारली. तिची व्यक्तिरेखा भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन (MOM) आणि मंगलयानाच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर रितू करिधल श्रीवास्तव यांच्यावर आधारित आहे. (Bollywood Actor)
सूरराई पोत्रू (Soorarai Pottru)
सूरराई पोत्रू (Soorarai Pottru) प्रवाशांना जास्त महागड्या विमानातून प्रवास करणं शक्य होत नव्हत. प्रवाशांना माफक दरामध्ये विमान प्रवास करता यावा, यासाठी कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांनी एअर डेक्कन या कंपनीची सुरूवात केली होती. नेदुमरन राजंगम उर्फ मारा, सुर्याने तमिळ चित्रपट सूरराई पोत्रूमध्ये भूमिका केली होती. या चित्रपटासाठी सुर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
शकुंतला देवी (Shakuntala Devi)
मानवी कम्प्युटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी (Shakuntala Devi) यांचे पात्र विद्या बालनने साकारले होते. शकुंतला देवी यांची ओळख फक्त भारतातच नाही तर, हॉलिवूडमध्ये ही कायम आहे.
सुपर ३० (Super 30)
हृतिक रोशनच्या सिनेकारकिर्दित सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे, सुपर ३० (Super 30) होय. चित्रपटात हृतिकने गणिताचे शिक्षक आनंद कुमार यांचे पात्र साकारले होते. आनंद कुमार यांनी बिहारमध्ये काही विद्यार्थ्यांना IIT मध्ये Entrance Exam साठी त्याने त्यांच्याकडून तयारी करून घेतली होती, ही कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.