Alibaba Ani Chalishitale Chor Piracy: 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' चित्रपट पायरसीचा शिकार, कलाकारांनी Video शेअर करत प्रेक्षकांकडे केली विनंती

Alibaba Ani Chalishitale Chor Marathi Movie: निर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच या चित्रपटाच्या पायसरीबाबतची बातमी समोर आली आहे.
Alibaba Ani Chalishitale Chor Piracy
Alibaba Ani Chalishitale Chor PiracySaam Tv

Alibaba Ani Chalishitale Chor Piracy

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) यांच्या 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांप्रमाणेच चित्रपटालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Marathi Film)

निर्माते आणि चित्रपट दिग्दर्शक चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच या चित्रपटाच्या पायसरीबाबतची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून प्रेक्षकांना असे आवाहन करण्यात आले आहे की, 'आम्ही हे चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवतो. त्यामुळे कृपया चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहा.' अशी विनंती प्रेक्षकांकडे करण्यात आलेली आहे. (Marathi Actress)

Alibaba Ani Chalishitale Chor Piracy
Crew Box Office Collection Day 7: बॉक्स ऑफिससह जगभरात 'क्रू' सुसाट, 7 दिवसांत केली छप्परफाड कमाई

चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने अभिनेत्री मुक्ता बर्वेने प्रेक्षकांना चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचेच आवाहन केले आहे. आवाहन करणारा हा व्हिडीओ ‘राजश्री मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, “प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थिएटर्समध्ये प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना, आमच्या हाती एक बातमी आली आहे, ती म्हणजे, आमचा चित्रपट पायरसीचा शिकार झाला आहे. पायरसी म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे.” (Social Media)

पुढे व्हिडीओमध्ये मुक्ता बर्वे म्हणते, “पायरसीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर आणि कलाकारांवर खूप मोठा अन्याय होतो. अनेकांची घरे यावर चालतात आणि पायरसीमुळे सगळीच आर्थिक गणिते बिघडतात आणि याचा फटका सगळ्यांनाच बसतो. चित्रपट आणि नाटकांवर प्रेम करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना माझी एक नम्र विनंती आहे, तुम्ही मराठी चित्रपट किंवा नाटक थिएटरमध्येच जाऊन पाहावा. खरंतर चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊनच पाहायला हवा. निर्माते चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठीच बनवतात. आपण सर्वांनीच पायरसीला आळा घालायला हवा. प्रेक्षकांनी चित्रपटावर असंच प्रेम कायम ठेवा.” (Marathi News)

Alibaba Ani Chalishitale Chor Piracy
Rashmika Mandanna Net Worth: २८ व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण आहे रश्मिका, एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी

दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे हे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत. चित्रपट थिएटरमध्ये २९ मार्चला रिलीज झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळत आहे. (Entertainment News)

Alibaba Ani Chalishitale Chor Piracy
Rashmika Mandana Birthday: घराचं भाडं द्यायला अन् खेळणी खरेदी करायला पैसे नव्हते; 'नॅशनल क्रश'चा डाऊन टू अर्थ थक्क करणारा फिल्मी प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com