Rashmika Mandanna Net Worth
Rashmika Mandanna Net WorthInstagram/ @rashmika_mandanna

Rashmika Mandanna Net Worth: २८ व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण आहे रश्मिका, एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी

Rashmika Mandanna Birthday: कायमच आपल्या स्माईल आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी रश्मिका मंदाना आज कोट्यावधींची मालकीण आहे. जाणून घेऊया रश्मिका मंदानाच्या नेटवर्थबद्दल...

Rashmika Mandanna Net Worth

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा आज २८ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटक राज्यातील कोडागु जिल्ह्यात झालेला आहे. वयाच्या १९ व्या वर्षी रश्मिकाने ‘किरिक पार्टी’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. कायमच आपल्या स्माईल आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी रश्मिका मंदाना आज कोट्यावधींची मालकीण आहे. जाणून घेऊया रश्मिका मंदानाच्या नेटवर्थबद्दल... (Tollywood)

Rashmika Mandanna Net Worth
Rashmika Mandana Birthday: कधीही नव्हते घराचं भाडं द्यायला अन् खेळणी खरेदी करायला पैसे; 'नॅशनल क्रश'चा डाऊन टू अर्थ थक्क करणारा फिल्मी प्रवास

रश्मिकाने आपल्या सिनेकरकिर्दित अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. १९९६ मध्ये जन्मलेल्या रश्मिकाने किरिक पार्टीमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून ती आजपर्यंत अनेक हिट चित्रपटांचा भाग झाली आहे. अभिनेत्री कायमच आपल्या स्टाईलमुळे आणि आपल्या स्माईलमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. रश्मिका मंदानाची अवघ्या २८ व्या वर्षी ६५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटांशिवाय ती जाहिरात आणि मॉडेलिंगमधूनही पैसा कमावते. (Rashmika Mandanna)

रश्मिका दरवर्षी जवळपास ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. एका चित्रपटासाठी रश्मिका चार ते पाच कोटी रुपयांचं मानधन घेते. रश्मिकाची टॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. ‘ॲनिमल’च्या यशानंतर रश्मिकाने तिच्या फीमध्ये घसघशीत वाढ केल्याचे बोलले जात आहे. (Entertainment News)

Rashmika Mandanna Net Worth
Loksabha Election: प्रकाश राज भाजपमध्ये प्रवेश करणार? पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com