गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची घोषणा झाली. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. वडील आणि मुलाचे नाते कायमच संवेदनशील असते.
मुळात वडील आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यामध्ये जर सुसंवाद साधला गेला तर हे नातं खूप सुंदर बहरू शकते. या रक्ताच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट ॲण्ड स्वीट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम आणि विनोद राव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, आपल्या वडीलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडील म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडील म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल दिसते. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडीलांची ओळख का लपवून ठेवली?, मुलगा कारण कळल्यानंतर वडीलांना स्वीकारणार का? अशा एक ना अनेक प्रश्नाचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक गणेश कदम यांनी सांगितले की, “चित्रपटाची कथा नावाप्रमाणेच खूपच सुंदर आहे. वडील आणि मुलाच्या नात्यामध्ये नेहमीच गुंतागुंत असते. पण, काही गोष्टी मान्य केल्या. सुसंवाद साधला तर हे नाते नक्कीच चांगले होऊ शकते. हेच दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून यामध्ये प्रचंड धमालही आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.