Shammi Kapoor And Mumtaz Love Story: २० वर्षांनी लहान मुमताजच्या प्रेमात पडले होते शम्मी कपूर; कशी होती दोघांची लव्ह स्टोरी? वाचा...

Shammi Kapoor News: २१ ऑक्टोबर १९३१ रोजी शम्मी कपूर यांचा जन्म झाला.
Shammi Kapoor And Mumtaz Love Story
Shammi Kapoor And Mumtaz Love StorySaam Tv
Published On

Shammi Kapoor Birth Anniversary

हिंदी सिनेसृष्टीत ५० आणि ६० च्या दशकात शम्मी कपूर यांनी खूप लोकप्रियता मिळवली होती. जेवढी लोकप्रियता त्यांची त्यावेळी होती, तितकीच लोकप्रियता आजही आहे, त्यांच्या चाहत्यांची संख्या सुद्धा बरीच मोठी आहे. २१ ऑक्टोबर १९३१ रोजी शम्मी (Shammi Kapoor Birth Anniversary) कपूर यांचा जन्म झाला. पण शम्मी कपूर यांचं खरं नाव शमशेर राज कपूर असं होतं.

शम्मी यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये शम्मी याच नावाने ओळखले जायचे. त्यांनी आपल्या हटक्या अभिनयाच्या माध्यमातून स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांची चर्चा जेवढी अभिनयामुळे व्हायची, तितकीच त्यांची चर्चा खासगी आयुष्यामुळेही होत होती. शमी कपूर यांची फॅनलिस्टमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्री देखील होत्या. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे मुमताज.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shammi Kapoor And Mumtaz Love Story
Aamir Khan Leaving Mumbai: आमिर खान सोडणार मुंबई, नेमकं काय आहे कारण?

‘ब्रह्मचारी’ मधील ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ हे गाणं मुमताज आणि शम्मी कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. आणि मुख्य बाब म्हणजे दोघांच्याही सिने कारकिर्दीतील हा एकमेव चित्रपट होता. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांच्याही लव्हस्टोरीची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुमताज शम्मी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी तशी कबुली ही दिली होती. शम्मी यांना देखील मुमताज आवडत होत्या.

दोघांमध्ये २० वर्षांचे अंतर होते. मुमताज वयाच्या १८ वर्षांच्या असताना शम्मी यांनी मुमताज यांना लग्नासाठी मागणी घातली होती. ज्यावेळी शम्मी यांना लग्नाची मागणी घातली तेव्हा, मुमताज यांना एक अट सुद्धा घातली होती. ती अट म्हणजे, लग्नानंतर मुमताज यांना फिल्मइंडस्ट्रीमध्ये काम करता येणार नाही. आणि त्याच अटीमुळे मुमताज यांनी शम्मी यांच्यासोबत लग्नासाठी नकार दिला होता.

त्यावेळी नुकतंच मुमताज यांनी आपल्या करियरला सुरूवात केली होती. पण कपूर घराण्याच्या परंपरेनुसार, त्याकाळात स्त्रियांना अभिनय करण्यास मनाई होती. पण ती अट मुमताज यांना मान्य नव्हती. मुमताज यांनी नकार दिल्यानंतर शमी यांनी कोणत्याच अभिनेत्रीसोबत लग्न करणार नाही, असा त्यांनी निर्णय घेतला.

Shammi Kapoor And Mumtaz Love Story
Shraddha Kapoor Post: जादू परत येतोय! श्रद्धा कपूरच्या पोस्ट कमेंट करत हृतिक रोशन दिली 'क्रिश ४'ची हिंट

शम्मी कपूर यांचे दोन लग्न झाले होते. पहिलं लग्न गीता बालीसोबत तर दुसरं लग्न नीला देवीसोबत. गीता बाली यांच्या लग्नाला गीता आणि शम्मी यांच्या फॅमिलीकडून विरोध होता. त्यामुळे त्यांनी लग्न मंदिरामध्ये करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या १० वर्षांनंतर गीता बाली यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे त्यांची दोन मुलेही पोरके झाले होते. त्यांची दोन्ही मुलं लहान असल्यामुळे फॅमिलीने शम्मी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी सुरुवात केली होती. शम्मी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नीला देवीसोबत लग्न करावे, अशी इच्छा होती. पण त्यांना ते अमान्य होतं.

फॅमिलीच्या दबावामुळे शम्मी यांनी काही अटी शर्तींवर दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. त्यातील पहिली अट म्हणजे, अर्ध्या रात्री मंदिरात लग्न करण्याची. आणि दुसरी अट म्हणजे, नीला कधीही आई होणार नाहीत. त्या सर्व अटी मान्य करत त्यांनी १९५५ मध्ये बाणगंगा मंदिरात अर्ध्या रात्री गीता बालीसोबत लग्न केले होते.

Shammi Kapoor And Mumtaz Love Story
Priyanka Chopra Photo: प्रियांका चोप्राने जुना फोटो शेअर करत 'बिग बॉस 17' मधील 'या' स्पर्धकाला दिला पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com