महाराष्ट्रातील नेत्यांनी The Kerala Story चे स्पेशल स्क्रिनिंग केल्याने केदार शिंदेंचा राग अनावर; म्हणाले- ‘नेत्यांना ठाऊक असेल का?...’

Kedar Shinde Tweet: नुकतंच ‘महाराष्ट्र शाहीर’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासंबंधित काही ट्वीट केले आहे.
Kedar Shinde On The Kerala Story
Kedar Shinde On The Kerala StorySaam Tv
Published On

Kedar Shinde On The Kerala Story: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींना आणि बड्या राजकीय नेत्यांना देखील हा चित्रपट चांगलाच पसंदीस उतरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत साडेचार कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटासोबतच गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. सध्या हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.

नुकतंच ‘महाराष्ट्र शाहीर’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटासंबंधित काही ट्वीट केले आहे. आता महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रदर्शित झालाय. हे राज्यातील नेत्यांना माहित आहे का? असा सवाल करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी ट्विट केलंय.

Kedar Shinde On The Kerala Story
The Kerala Story Collection Day 2: प्रचंड विरोधानंतर ‘द केरला स्टोरी’ केले दुसऱ्या दिवशी धमाकेदार कलेक्शन…

जरी ही दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुढे- मागे प्रदर्शित झाले असले तरी, या दोघांध्येही चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’चित्रपटातील सर्वच कलाकारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा बरीच होत आहे. तर ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटावर घातलेली बंदी केरळ उच्च न्यायालयाने उठवल्यानंतर चित्रपटाने आतापर्यंत जवळपास १२.५० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली आहे.

Kedar Shinde On The Kerala Story
Gauhar Khan Baby Bump: कुणी येणार गं! गौहर खानने फ्लॉन्ट केले बेबी बंप, फोटो होतायेत व्हायरल

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले जात आहेत. यामुळे ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज्यातील राजकीय पुढाऱ्यांवर कमालीचे संतापले आहेत. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये केदार शिंदे म्हणतात, “दुर्दैव... महाराष्ट्रात ‘द केरला स्टोरी’या सिनेमाचे खास शो आपल्या महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करुन लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? ”

सध्या या केदार शिंदेंच्या या ट्वीटची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. केदार शिंदेंनी हे ट्विट शेअर केल्यानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ विरुद्ध ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. केदार शिंदेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी ‘खरचं दुर्दैव आहे की, महाराष्ट्राला आज हे दिवस बघायला लागत आहेत, या दोन्ही सिनेमांची तुलना होऊच शकत नाही, स्वतःच्या आजोबांच्या चित्रपटासाठी तुम्ही आग्रही असणं समजू शकतो. पण म्हणून ज्वलंत आणि महत्त्वाच्या ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणं हा स्वार्थीपणा आहे,’अशा संमिश्र प्रतिक्रिया सध्या नेटकरी त्या ट्विटच्या माध्यमातून देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com