Renuka Shahane : 'तेव्हा आईची खरी किंमत कळते...', रेणुका शहाणेंनी सांगितले आईचं महत्त्व, पाहा VIDEO

Renuka Shahane Talk On Mother : मराठी अभिनेत्री रेणुका शहाणेंनी आपल्या आयुष्यातील आईचं महत्त्व सांगितले आहे. ते नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊयात.
Renuka Shahane Talk On Mother
Renuka ShahaneSAAM TV
Published On
Summary

रेणुका शहाणे यांचा 'उत्तर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'उत्तर' चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली आहे.

रेणुका शहाणेंनी आईचं महत्त्व सांगितले आहे.

रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अभिनय बेर्डे यांचा 'उत्तर' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त रेणुका शहाणे यांनी नुकत्याच सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत आईविषयी भरभरून बोलल्या आहेत. रेणुका शहाणे यांनी मुलाखतीत आईपण, पालकत्व, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतच्या आठवणी आणि त्यांच्या मुलासोबत काम करण्याचा अनुभव यावर भरभरून बोल्या आहेत.

"मुलाखतीत जेव्हा रेणुका शहाणे यांना आईची किंमत केव्हा कळते?" असे विचारण्यात आले त्या म्हणाल्या की, "आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आईची खरी किंमत कळते. कॉलेजचे वय, नोकरी हा सुरुवातीचा काळ जेव्हा असतो, तेव्हा आईबाबत धन्यवादाची वृत्ती आपल्याला झालेली नसते. तेवढी आपल्यात समज नसते. आपण कॉलेज आणि नोकरीचे आयुष्य अनुभवत असतो. माझ्या लग्नानंतर, मुलांचा जन्म झाल्यावर, जसे वय वाढत गेल. तेव्हा प्रकर्षाने जाणवते की आपल्या आयुष्यात आईचा केवढा मोठा भाग आहे. लग्नानंतर संसार वेगळा मांडला जातो. मुलांची जबाबदारी, काम, व्यवसाययामुळे आधीप्रमाणे आता आईसोबत वेळ घालवता येत ‌नाही."

रेणुका शहाणे आपल्या मुलांविषयी बोलताना म्हणाल्या, "माझा मोठा मुलगा 23 वर्षांचा आहे. धाकटा आता 21 वर्षांचा होईल. तेव्हा आता त्यांना वाटतंय आपण किती भाग्यशाली आहोत... आपल्याला असे आई-बाबा मिळाले. ही भावना आम्ही एन्जॉय करतो, कारण ते आधी पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात. आपण घेतलेले निर्णय योग्य आहे की नाही? हे आपल्याला मुलांच्या व्यवहारातून समजते. जेव्हा त्यांचा व्यवहार पाहून काही लोक बोलतात की, यांच्यावर संस्कार चांगले आहेत. हे खूप चांगले वागतात. तेव्हा आपल्याला वाटते आपण मुलांसाठी निवडलेला मार्ग बरोबर आहे. "

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'उत्तर' 12 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चाहते त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक आहेत. 'उत्तर' ही आई-मुलाची एक निखळ, प्रेमाची कथा आहे.

Renuka Shahane Talk On Mother
Orry : ऑरीच्या अडचणी वाढल्या, 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com