Prajakta Mali: प्राजक्ताला चक्क सलमानसोबत करायचंय लग्न?; प्राजुच्या वक्तव्याने चर्चांना उधाण...

बिनधास्त, बेधडक आणि दिलखुलास स्वभावाच्या प्राजक्ताचे एक नवे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.
Prajakta Mali Wanted To Marry Salman
Prajakta Mali Wanted To Marry SalmanSaam Tv
Published On: 

Prajakta Mali Wanted To Marry Salman: अभिनेत्री प्राजक्ता माळी दिवसेंदिवस सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती सोशल मीडियावर आपल्या हटक्या स्टाईल मधील फोटोंमुळे चर्चेत आहे. आधी अभिनेत्री आणि आता उद्योजिका अशी नवी ओळख निर्माण करत प्राजक्ताने आपल्या चाहत्यांमध्ये नवी ओळख निर्माण केली. बिनधास्त, बेधडक आणि दिलखुलास स्वभावाच्या प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अशातच प्राजक्ताचे एक नवे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे.

Prajakta Mali Wanted To Marry Salman
Why did Raghu-Rama Leave Roadies: रघु - रामने स्पष्ट केले ‘रोडिज’ सोडण्याचे कारण; शो बद्दल केली मोठी पोलखोल

प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपल्या बिझी शेड्युल्डमध्ये देखील ती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहते. नुकतेच तिने ‘लोकमत’ सोबत संवाद साधला. त्यावेळी तिने एक सर्वात जुना किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

यावेळी प्राजक्ताला तुझा सर्वाधिक आवडता पहिला सेलिब्रिटी कोण? असा प्रश्न विचारला होता. यावेळी ती म्हणते, “माझा आवडता सेलिब्रिटी सलमान खान आहे. मी दोन तीन वर्षांची होते. माझ्या आत्येभावाचा सलमान खान खूप आवडता सेलिब्रिटी आहे. त्याने मला त्यावेळी ‘मला सलमान खानशी लग्न करायचं.’ असं म्हणायला शिकवलं होतं.” हे सांगताना प्राजक्ताला जुन्या आठवणी येत तिचं हसू आवरत नव्हतं.(Latest Marathi News)

Prajakta Mali Wanted To Marry Salman
Chrisann Pereira Arrested In UAE: 'सडक २' फेम अभिनेत्री अडचणीत; अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात क्रिशन परेराला दुबईत अटक

सध्या हे प्राजक्ताचं वक्तव्य सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत असून तिने गेल्या एका मुलाखतीत आणखी एक सेलिब्रिटीचं नाव घेतलं होतं. तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून वैभव तत्ववादी आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटापासून तो माझा क्रश आहे. त्यानंतर आम्ही एका चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलो होतो. त्यावेळी आमच्यामध्ये चांगली मैत्री देखील होती. आता आम्ही एकमेकांचे क्रश राहिलेलो नाहीत.(Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.