Prajakta Gaikwad New Video: लग्नानंतर प्राजक्ताचा पारंपारिक पद्धतीने चुडा उतरवण्याचा कार्यक्रम; व्हिडीओ पाहून होतय सौंदर्याचं कौतुक

Prajakta Gaikwad New Video: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. मागील अनेक दिवसांपासून प्राजक्ताच्या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
prajakta gaikwad
prajakta gaikwadSaam Tv
Published On

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. मागील अनेक दिवसांपासून प्राजक्ताच्या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. थाटामाटात पण पारंपारिक पद्धतीने २ डिसेंबर रोजी प्राजक्ताने शंभुराज खुटवडशी लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड स्वत: चाहत्यांना लग्नाविषयीच्या अपडेट देत आहे. अशातच नुकताच प्राजक्ताने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.

prajakta gaikwad
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' ची चमकदार ट्रॉफी पाहिली का? PHOTO होतोय व्हायरल

लग्नसंमारभात मुलीच्या पारंपारिक साजश्रृंगाराला विशेष महत्व असते. प्राजक्ताने देखील लग्नातील सर्व विधी पार पाडले आहेत. चुडा भरण्यापासून ते जेजुरी देवदर्शन असे सर्व कार्यक्रम प्राजक्ताचे झाले आहेत. नुकताच जेजुरीहून आल्यानंतर प्राजक्ताचा जागरण गोंधळ कार्यक्रम पार पडला यानंतर आता प्राजक्ताचा चुडा उतरवणीचा कार्यक्रम पार पडला आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताने व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

प्राजक्ता चुडा उतरवणीच्या कार्यक्रमाला लाल रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताचं लग्नानंतरचं सौंदर्य खुललं आहे. गळ्यात मंगळसूत्र, कपाळी टिकली, हिरव्या बांगड्या, नाकात नथ असा तिनं मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी देखील तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं की,आपली मराठी संस्कृती जपण्यासारखा आनंद नाही , तर आणखी एकाने, अशी एक अभिनेत्री जी सर्व मराठ मोळे परंपरा जपून स्वतःचे लग्न केले अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

prajakta gaikwad
Kshitish Date : मराठी प्रेक्षकांसाठी नवं नाटक; क्षितिज दाते मुख्य भूमिकेत, कुठे अन् कधी पाहता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com