BMC Election Result: प्रसिद्ध अभिनेत्री झाली मुंबईची नगरसेवक; ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ

BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे.
Marathi actress Nisha Parulekar has won election from ward number 25 in Mumbai
Marathi actress Nisha Parulekar has won election from ward number 25 in MumbaiSaam tv
Published On

BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवणाऱ्या निशा परुळेकर यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव करत राजकीय मैदानात यशस्वी एन्ट्री केली आहे. त्यांच्या या विजयामुळे ठाकरेसेनेला मोठा धक्का बसला असून, येत्या काळात मुंबईच्या राजकारणात नवीन समीकरण पहायाला मिळणार आहे.

निशा परुळेकर या भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी स्थानिक प्रश्न, नागरी समस्या, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या रोजगारावर भर दिला होता. जनसंपर्क, घरोघरी भेटी आणि सोशल मीडियाच्या उत्तम वापरामुळे त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. याचा फायदा त्यांना निवडणुकीत स्पष्टपणे झाल्याचे निकालातून दिसून आले.

Marathi actress Nisha Parulekar has won election from ward number 25 in Mumbai
Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

प्रभाग क्रमांक २५ ची ही लढत अत्यंत चुरशीची ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. योगेश भोईर हे ठाकरेसेनेचे ओळखीचे आणि अनुभवी चेहऱ्यांपैकी एक आहेत. मात्र, मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये सुरुवातीपासूनच निशा परुळेकर यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखली. अखेर मतदारांनी स्पष्ट कौल देत निशा परुळेकर यांना विजयी केले.

Marathi actress Nisha Parulekar has won election from ward number 25 in Mumbai
BMC Election Result: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा मुंबई महापालिका निवडणुकीत दारुण पराभव; ठाकरेंच्या उमेदवाराने चारली धूळ

निशा परुळेकर या केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्या म्हणूनही प्रभाग क्रमांक २५मध्ये ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून त्या पक्ष संघटनेत सक्रिय असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com