कुशल आणि हेमांगीची निखळ मैत्री, फेसबुकवर 'दोस्ता'साठी खास पोस्ट चर्चेत

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कुशल बद्रिके बद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Hemangi Kavi
Hemangi KaviSaam Tv
Published On: 

हेमांगी कवी सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. नेहमीच फेसबुकवरील पोस्टने हेमांगी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. तिच्या फेसबुक पोस्टवर नेटकरी तिला बऱ्याचदा ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. तिची बिनधास्त स्वभाव, सोशल मीडियावर रोखठोक मत मांडणे आणि मिश्किल भाषेत काही खास पोस्ट करणे ही तिची सोशल मीडियावरील ओळख सर्वांनाच माहित आहे. प्रेक्षकांच्या मनावर हेमांगीने मराठी सिनेमा, मालिका आणि नाटकांतून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.

Hemangi Kavi
Samantha Ruth Prabhu: घटस्फोटानंतरही नागाचैतन्याला समांथाची काळजी, फोन करत प्रकृतीची विचारपूस

सोबतच हेमांगी सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती देत असते. कोणत्याही विषयावर ती स्वत:चे परखड आणि बिनधास्त मत मांडत असते. नुकतेच तिने एका विनोदवीरासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो मधील प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कुशल बद्रिके बद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. फेसबुकवर हेमांगी नेहमीच सक्रिय असते, नुकतेच तिने फेसबुक पोस्ट शेअर केले असून त्यात कुशल बद्रिकेचे काही खास फोटो आहे. त्यातील एका फोटोत कुशल गिटार वाजवताना दिसत आहे.

Hemangi Kavi
Sambhaji Raje: ...तर गाठ माझ्याशी आहे; मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटवरुन संभाजीराजे संतापले

त्या फोटोला तिने कॅप्शन दिले की, ''मेरे घर आया एक ‘नन्हा परा’!!! माझी ही शाब्दिक कोट्यांची nonsenseगिरी जगात कुणाला कळली असेल तर हा माणुस आणि म्हणुनच त्याने ती ‘ए ए वेडा बाई’ म्हणत फु बाई फु मध्ये उचलून धरली होती, work झाली होती.

आज ही आमच्या जोडीला miss केलं जातं ही त्याचीच पावती आणि तसंही हा नन्हा पराच आहे कारण हा सतत म्हणत असतो ना आपल्या आत एक लहान मुल दडलेलं असतं वगैरे… याच्या बाबतीत ते लहान मुल फक्त आत नाही तर बाहेरही बागडतय… फक्त त्याला हे माहीत नाही एवढंच''

Hemangi Kavi
Siddharth Chaturvedi: महिला फॅन्सच्या कृतीने आभिनेत्यालाही बसला धक्का; प्रमोशन इव्हेंटमध्ये घडलं....

सोबतच ती पुढे बोलते, "आणि कधी माहीत ही होऊ नये हीच इच्छा! मित्र- मैत्रिणी, यार, friends बरेच असतात पण ‘दोस्त’ या शब्दाचा खरा अर्थ जगणारा एक नन्हासा, प्यारासा unfiltered दोस्त! Kushal Badrike ऐसेही रह मेरे पगले! काम तर वाजवतोसच तु..

वाद्य ही वाजवत रहा ( खुप छान guitar वाजवली काल त्याने), छान छान लिहीत रहा, भारी भारी सुचत राहो तुला! दोस्त येती घरा तोची दिवाळी दसरा! त. टी. : आज काय त्याचा birthday वगैरे नाहीए याची मंडळाने नोंद घ्यावी. मला वाटलं लिहावंसं त्याच्या विषयी… लिहीलं!"

दरम्यान हेमांगीची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करतानाही दिसत आहेत. ती सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.

Hemangi Kavi
Rishab Shetty: कांतारा चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने दिला यशाचा मंत्र, म्हणाला....

कुशल आणि हेमांगीने झी मराठीवरील 'फु बाई फु' या विनोदी कार्यक्रमात एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून दोघे चांगले मित्र आहेत. आगामी काळात तो रवी जाधव दिग्दर्शित सिरीजमध्ये सुष्मिता सेन बरोबर झळकणार आहे. तर कुशल चला हवा येऊ द्या मध्ये झळकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.