Girija Oak: प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओकचा पाय फ्रॅक्चर, व्हिलचेअरवर बसून शेअर केली पोस्ट

Girija Oak Instagram Post : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकच्या पायाला दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गिरीजाने ही माहिती शेअर केली आहे.
Girija Oak
Girija Oakinsta
Published On

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ती काही हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे. गिरीजा तिच्या कामांमुळे सतत चर्चेत असते. पण सध्या गिरीजा ओक तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.

गिरीजा ओक सोशल मीडियावर सक्रीय आहे. वैयक्तिक आयुष्याबाबतचे अपडेट्स ती वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गिरीजाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसते. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गिरीजाच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Girija Oak
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

गिरीजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या उजव्या पायाला प्लास्टर असल्याचे पाहायला मिळते. पायाची हालचाल होऊ नये म्हणून तिचा पाय पूर्णतः प्लास्टरमध्ये आहे. ती व्हिलचेअरवर बसल्याचेही फोटोमध्ये दिसते. इन्स्टाग्राम पोस्टवर गिरीजाने एक्सरेचा फोटो देखील शेअर केला आहे. पण पायाला नेमकी दुखापत कशी झाली याबाबत गिरीजाने काहीच स्पष्ट केलेले नाही. या पोस्टला तिने 'अपघातानंतरचे आयुष्य...' असे कॅप्शन दिले आहे. गिरीजा ओकवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Girija Oak
Abu Azmi : आषाढी वारीबाबत अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य; वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही रस्त्यावर नमाज पठन केल्यावर मात्र...

गिरीजा शाहरुख खानच्या ब्लॉकबास्टर 'जवान' या हिंदी चित्रपटामध्ये झळकली होती. याआधी तिने 'तारे जमीन पर' या सुपरहिट चित्रपटामध्ये आमिर खानसह स्क्रीन शेअर केली होती. करोना काळातील संघर्ष दाखवणाऱ्या 'व्हॅक्सीन वॉर' या हिंदी चित्रपटातील गिरीजाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

Girija Oak
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com