Sayaji Shinde: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...; सयाजी शिंदेंनी बालमित्रासाठी बूक केल विमान, पाहा व्हिडिओ

Sayaji Shinde Friendship: चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि गुणी अभिनेते सयाजी शिंदे हे केवळ अभिनयातच नव्हे, तर आपल्या माणुसकीच्या आणि दिलदार स्वभावामुळेही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSaam tv
Published On

Sayaji Shinde: मराठी मनोरंजन सृष्टीत असे अनेक मित्र आहेत ज्यांच्या मैत्रीचे कौतुक नेहमीच केले जाते. यामध्ये अशोक सराफ - सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी- प्रसाद ओक, हेमंत ढोमे - सिद्धांत चांदेकर अशा अनेक जोड्या आहेत. पण यावेळी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार यांनी आपल्या बालपणीच्या मित्राला मोठ सरप्राईज देऊन सगळ्यांना थक्क केल आहे.

चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि गुणी अभिनेते सयाजी शिंदे हे केवळ अभिनयातच नव्हे, तर आपल्या माणुसकीच्या आणि दिलदार स्वभावामुळेही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात सयाजी शिंदेंनी त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्रासाठी खासगी विमानाची (Private Jet) व्यवस्था केल्याचं पाहायला मिळतं. हा प्रसंग सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

Sayaji Shinde
Arijit Singh: 2 तासांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी अरिजित सिंग घेतो इतके कोटी रुपये; आकडा ऐकून बसेल धक्का

मित्रासाठी खासगी विमानाची व्यवस्था

व्हिडिओमध्ये सयाजी शिंदे एका खासगी विमानतळावर दिसतात. त्यांच्या एका मित्राने पहिल्यांदाच विमानप्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा फक्त पूर्णच केली गेली नाही, तर त्यासाठी खासगी चार्टर्ड फ्लाइट बुक करून सरप्राईज देण्यात आलं. हा क्षण त्यांच्या मित्रासाठी आयुष्यातील अविस्मरणीय ठरला.

Sayaji Shinde
Bollywood Actress: 'हीरामंडी'च्या यशानंतर एकही काम मिळालं नाही...'; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केल दु:ख, म्हणाली...

"मित्र वणव्यात गारव्यासारखे असतात"

या प्रसंगी सयाजी शिंदे म्हणाले, "मित्र वणव्यात गारव्यासारखे असतात. आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपण पैशाने नव्हे, तर प्रेमाने मोठे करतो. त्यांच्या या बोलण्यातून त्यांच्या अंतःकरणातील भावनांची झलक स्पष्टपणे जाणवते.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ जसजसा सोशल मीडियावर पोहोचतो आहे, तसतसं नेटकऱ्यांकडून सयाजी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “खऱ्या अर्थाने हिरो!”, “मैत्रीचं सुंदर उदाहरण”, “माणुसकी अजूनही जिवंत आहे” अशा प्रतिक्रिया नेटकर्‍यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com