Bollywood Actress Have No Work : बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या नेटफ्लिक्सवरील मालिकेत बिब्बोजान ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या भव्य सिरीजनं अदितीला मोठं यश मिळवून दिलं. मात्र, या यशानंतरही तिला अजूनपर्यंत कोणतंही नवीन काम मिळालेलं नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत अदिती म्हणाली, “हिरामंडी मालिकेमुळे मला प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळाली. प्रेक्षकांनी आणि इंडस्ट्रीतील लोकांनी माझं काम आवडलं असल्याचं सांगितलं. पण या यशानंतरही अजूनपर्यंत मी काहीच नवीन प्रोजेक्ट साइन केले नाही. मी अजूनही कामाच्या संधींची वाट पाहतेय.”
तिच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील स्पर्धा आणि महिला कलाकारांसमोरील संधींच्या मर्यादा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अदितीने बिब्बोजान ही भूमिका अतिशय संयमितपणे आणि ताकदीनं साकारली होती. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. तरीही, कामाच्या संधी मिळण्यात विलंब होत असल्याचं ती म्हणाली.https://www.instagram.com/aditiraohydari/?hl=en
या काळात अदितीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नुकतीच तिनं अभिनेता सिद्धार्थसोबत लग्न केलं. करिअरमधील 'ड्राय स्पेल'मुळेच लग्नाचा निर्णय घेतल्याचं तिनं स्पष्ट केलं. अदितीनं हेही सांगितलं की, अनेकदा महिला कलाकारांच्या भूमिकांकडे केवळ 'अपवादात्मक' दृष्टिकोनातून म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे त्या दीर्घकालीन संधींपर्यंत पोहोचत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.