Sanjay Narvekar : संजय नार्वेकरांच्या कॉमेडीचा तडका, 'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाचा धमाकेदार टीझर पाहिलात?

Mhanje Waghache Panje Teaser : मराठी अभिनेते संजय नार्वेकर यांचा 'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.
Mhanje Waghache Panje Teaser
Sanjay narvekarSAAM TV
Published On

2025मध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवानी पाहायला मिळणार आहे. या वर्षी अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता संजय नार्वेकर यांचा 'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे हटके टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सध्या याच 'म्हणजे वाघाचे पंजे'ची (Mhanje Waghache Panje) सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.

'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपटाच्या टिझरने आता सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. उत्तम विनोदी सीन आणि लय भारी कथेची जोड असलेल्या या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. लग्नाच्या बाबतीत कुटुंबाचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं कराव. कुटुंबाने निवडलेला तो मुलगा आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे का? अशा मनस्थितीत असलेल्या एका मुलीच्या आयुष्यातील प्रवास चित्रपटात पाहता येणार आहे. या जबरदस्त चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay narvekar) आपल्या विनोदाचा तडका लावणार आहेत.

'म्हणजे वाघाचे पंजे' चित्रपट स्वरूप सावंत दिग्दर्शित आहे. या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री तमन्ना बांदेकर प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून तिचे सिनेविश्वातील हे पदार्पण आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये तमन्नाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. तसेच या चित्रपटात सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर , चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Mhanje Waghache Panje Teaser
Jasmin Walia VIP Treatment : हार्दिक पंड्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडला VIP ट्रीटमेंट, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com