Laxmikant Berde Death Anniversary: लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा लहानपणापासूनच अभिनयाकडे सर्वाधिक कल होता. मध्यमवर्गीय कुटुंबात राहूनही त्यांनी एवढी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली, यासाठी त्यांचे आजही मराठी चित्रपटसृष्टीत कौतुक केले जाते. चाळीत लहानाचे मोठे झालेले लक्ष्मीकांत शाळेतही अनेकदा नाटकात भाग घ्यायचे. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केले. पण लक्ष्मीकांत यांना केवळ साईड रोलमध्येच भूमिका मिळत होत्या.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काही काळ साईड रोल केले,पण त्यानंतर त्यांनी 'टूर टूर' या मराठी नाटकातही काम केले होते. त्याला पहिल्यांदाच नाटकात काम करण्याची संधी मिळाली. लक्ष्मीकांत नेहमी आपल्या अभिनयात जीव ओतून काम करत असल्याने त्यांच्या प्रत्येक भूमिकेने नाव कमावले. जरी त्याची मुख्य व्यक्तिरेखा नसली तरी तो त्या कलाकृतीत आपल्या पात्राला खुपच अढळ स्थान देत काम करायचा. 'टूर टूर' या मराठी नाटकात लक्ष्मीकांतची व्यक्तिरेखा चाहत्यांना फारच पसंतीस आली होती.
लक्ष्मीकांत बेर्डेंना मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉमेडी किंग' या नावानेही ओळखू लागले. आपल्या अभिनय प्रवासात लक्ष्मीकांत बेर्डेंनी चित्रपटांसोबतच काही टीव्ही शोमध्येही काम केले. लक्ष्मीकांत यांनी जिथे जिथे काम केले तिथे यश संपादन केलेच. बेर्डे यांनी आपल्या अभिनयसृष्टीतील कारकिर्दीत मराठी आणि हिंदी भाषेत 200 हून अधिक चित्रपटात मुख्य भूमिका केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटांपाठोपाठ हिंदी चित्रपटांतही काम केले, त्यातही त्यांनी आपले यश संपादन केले.
सलमान खानसोबतच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटात लल्लू (नोकर)ची भूमिकाकरत मुळे घराघरात आपले नाव कमवले. 1989 मध्ये लक्ष्मीकांतने सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाने लक्ष्मीकांत यांना रातोरात स्टार बनवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आपल्या अभिनयाच्या प्रवासात बेर्डे यांनी '100 डेज', 'हम आपके है कौन' आणि 'साजन' यांसारख्या अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये साईड रोल करूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सलमानच्या काही चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत यांनी नोकराचीच भूमिका साकारली होती. 'धूम धडाका' आणि 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटांसह त्यांचे अनेक मराठी चित्रपट बरेच गाजले. आजही टेलिव्हिजनवर हे चित्रपट प्रेक्षक पाहत असतील तर त्यांना कधीच हसू आवरत नाहीत. लक्ष्मीकांतने या जगातून खूपच लवकर एक्झिट घेतली. वयाच्या ५० व्या वर्षी किडनीच्या आजाराने निधन झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.