Chinmay Mandlekar Fraud Call: 'पैसे भर नाहीतर...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल, नेमकं प्रकरण काय?

Chinmay Mandlekar Fraud Call: मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला वीजबिल थकबाकीच्या नावाखाली सायबर फ्रॉडचा फोन आला. अभिनेत्याने नागरिकांनी अशा कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन दिले.
Chinmay Mandlekar Fraud Cal
Chinmay Mandlekar Fraud CalSaam tv
Published On

Chinmay Mandlekar Fraud Call: आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात लोक तर जवळ आले आहेत पण फ्रॉडचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामान्य लोकांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत हल्ली कोणासोबतही फ्रॉड होऊ शकतो. असाच एक धक्कादायक (फ्रॉडचा प्रकार मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरसोबत घटला आहे. त्याने याबद्दल जनजागृती करत सोशल मीडियावर हा प्रकार सांगितला.

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला अलीकडेच एका सायबर फसवणुकीचा फ्रॉड फोन आला होता, ज्यात त्याला वीज/बिल न भरल्यास ३० मिनिटांत लोक घरात येतील अशी धमकी दिली गेली होती. चिन्मय मांडलेकरने हा अनुभवसोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना या प्रकारच्या फोन कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Chinmay Mandlekar Fraud Cal
Death News: प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं निधन; ४२ व्या वर्षी स्वतःवर गोळी झाडून संपवलं आयुष्य

अभिनेता चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर पोस्टमध्ये कॉल रेकॉर्डिंगसह व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉर्टही शेअर करत गितलं की, एक दिवस त्याच्या पत्नीला गॅस कनेक्शन बिल भरलं नसल्याचा मेसेज आला. त्यानं पोस्टमध्ये फोनची व्हॉइस रेकॉर्डींग शेअर केली ऐकवलीय. त्यात फोन करणारा अज्ञात माणून त्याच्या पत्नीला म्हणतो की, जानेवारी महिन्याचं 1068 रुपये बिल भरलेलं नाही. तुमचं बिल अपडेट दिसत नाही. व्हॉटस्अॅपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही तर पुढच्या 30 मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील.

Chinmay Mandlekar Fraud Cal
Actress Sandel: ठाण्यात प्रसिद्ध अभिनेत्रीकडून देहविक्रीचा व्यवसाय; ग्राहकांना गुपचूप पाठवायची फोटो, असा झाला भंडाफोड?

पण, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या लक्षात आलं की हा स्कॅमचा प्रकार असू शकतो त्यामुळे तिने त्यांना सांगितलं, तुम्ही म्हणताय तसा मला कोणताच मेसेज आलेला नाही. याशिवाय कनेक्शन कट करायला जी माणसं येणार आहेत, त्यांनी पहिलं मला भेटलं पाहिजे. यावर स्कॅमर गोंधळला आणि हा फ्रॉड फोन कॉल आहे हे त्यांच्या लक्षात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com