Sachin Pilgaonkar: 'मी उर्दूसोबत झोपतो, रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच...; सचिन पिळगांवकरांचे पुन्हा एक वकव्य चर्चेत

Sachin Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर त्यांच्या कामासह त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असतात.
Sachin Pilgaonkar
Sachin PilgaonkarSaam Tv
Published On

Sachin Pilgaonkar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगांवकर त्यांच्या कामासह त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीचं चर्चेत असतात. सध्या पिळगांवकरांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. एका उर्दू साहित्यिक कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी उर्दू भाषेबद्दल असलेले आपले गाढ प्रेम व्यक्त केले.

सचिन पिळगांवकर म्हणाले, “मराठी माझी मातृभाषा आहे, पण मी विचार उर्दूतूनच करतो. एखाद्याने मला रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच उत्तर देतो.” त्यांच्या या विधानानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Sachin Pilgaonkar
Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

‘बहार-ए-उर्दू’ या कार्यक्रमात बोलताना सचिन पुढे म्हणाले, “मी उर्दू भाषेत विचार करतो, मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही, मी स्वप्नही उर्दूत पाहतो. ही भाषा मला आत्म्याच्या जवळची वाटते. मीना कुमारी यांनी मला ही भाषा शिकवली आणि त्यानंतर मी तिच्या प्रेमात पडलो.”

Sachin Pilgaonkar
SRK Red Chillies Entertainment: शाहरुख खानच्या 'रेड चिलीज'ला हायकोर्टाकडून समन्स; ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

सचिन पिळगांवकरांनी सांगितले की उर्दू भाषेची गोडी, नजाकत आणि शब्दांतील सौंदर्य यांनी त्यांना नेहमीच मोहित केले आहे. “मी जरी मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असलो, तरी माझं मन उर्दूच्या कवितेत, गझलांमध्ये रमलेलं असतं, माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.” असे सचिन यांनी सांगितले.

दरम्यान, सचिन पिळगांवकरांनी ‘शोले’, ‘नदिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘बचपन’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’ सह अनेक गाजलेले बॉलीवूड चित्रपट केले आहेत. तर, मराठीमध्ये ‘अशीही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com