प्रसिद्ध अभिनेत्याचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन
मनोरंजन विश्वावर शोककळा
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे. अभिनेते, नाट्यकलाकार आणि डबिंग कलाकार मुरुगन पनाविला (श्रीमुरुगन ) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याला नेमकं झालं काय होत, जाणून घेऊयात.
newindianexpress च्या वृत्तानुसार, अभिनेते मुरुगन हे चेम्पाझंथी येथील पनाविला हाऊसचे रहिवासी होते. त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २१ जुलै रोजी कोझिकोडमधील वडकरा येथे एका नाट्यप्रयोगाच्या तालमीदरम्यान मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव (ब्रेन हॅमरेज) झाला. त्यांना तातडीने कोझिकोडमधील एका खाजगी रुग्णालयात आणि नंतर तिरुवनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. २५ जुलै रोजी दुपारी त्यांना 'ब्रेन डेड' (मेंदू मृत) घोषित करण्यात आले.
अभिनेते मुरुगन यांनी आपल्या मृत्यूनंतरही अनेकांना जीवनदान दिले. अभिनेत्याच्या अवयवदानाद्वारे पाच जणांना नवजीवन दिले. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. 'मंजिल विरिंजा पूवू' या टिव्ही मालिकेतील 'सीआय जोसेफ'च्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.