Popular Actor : लाइव्ह शोदरम्यान प्रसिद्ध अभिनेता स्टेजवर कोसळला अन्...; प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवलं

Rajesh Keshav-Heart Attack : लोकप्रिय अभिनेता राजेश केशवला हृदयविकाराचा झटका आला आहे. तो आता रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
Rajesh Keshav-Heart Attack
Popular Actor SAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेता लाइव्ह शोदरम्यान स्टेजवर कोसळला.

राजेश केशवला हृदयविकाराचा झटका आला आहे.

राजेश केशवची प्रकृती चिंताजनक आहे.

मनोरंजन क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता राजेश केशवची अचानक तब्येत बिघडली आहे. राजेश एक कार्यक्रम करत असताना त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो स्टेजवर बेशुद्ध होतो. सध्या राजेश केशववर (Rajesh Keshav) उपचार सुरू आहेत. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मीडिया रिपोर्टनुसार, राजेश केशव स्टेजवर बेशुद्ध होऊन पडताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समजले. राजेश केशववर त्वरित अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. अँजिओप्लास्टीनंतर 72 तासांत प्रकृतीत सुधारेल असे सांगितले आहे. राजेश केशव कोची येथे लाईव्ह कार्यक्रमादरम्यान स्टेजवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजेश केशव याच्या हृदयविकाराचा झटक्याची बातमी ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी चाहते आणि कलाकारमंडळी प्रार्थना करताना दिसत आहेत. राजेश केशवने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात 'नी-ना', 'ब्युटीफुल', 'हॉटेल कॅलिफोर्निया', 'शेरो' या चित्रपटांचा समावेश आहे.

दिग्दर्शक प्रताप जयलक्ष्मी यांनी देखील राजेश केशवच्या प्रकृतीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. राजेश केशवने आजवर साऊथच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहता तो लवकर ठीक होऊन त्याच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Rajesh Keshav-Heart Attack
Vicky Kaushal : शंभू महाराजांची मूर्ती पाहताच विकी कौशलनं केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा, नेटकऱ्यांकडून कौतुक; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com