Keshav Maharaj: मैदानात आल्यावर राम सिया राम गाणं का वाजतं? केशव महाराजने केला खुलासा

Keshav Maharaj News: जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू केशव महाराज जेव्हा जेव्हा फलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हाही राम सिया राम हे गाणं वाजवलं जातं
keshav maharaj
keshav maharaj saam tv news
Published On

Keshav Maharaj On Ram Siya Ram:

क्रिकेट सामना सुरु असताना स्टेडियममध्ये डीजेवर गाणी वाजवली जातात. कधी देशभक्तिपर गीतं कर कधी कधी भक्तिगीतंही ऐकू येतात. दरम्यान हे भारतीय खेळाडूंससोबत होणं सामान्य गोष्ट आहे.

मात्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू केशव महाराज जेव्हा जेव्हा फलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हाही राम सिया राम हे गाणं वाजवलं जातं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पार पडलेल्या एका कसोटी सामन्यादरम्यान केएल राहुलनेही त्याला विचारणा केली होती की,तू जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा हे गाणं वाजवलं जातं.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जेव्हा केशव महाराज फलंदाजीला आला त्यावेळी मैदानात राम सिया राम हे गाणं वाजवलं गेलं. त्यावेळी भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीही हात जोडताना दिसून आला.

सध्या केशव महाराज दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत डरबन सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करतोय. त्याला जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की,'तर गोष्ट अशी होती की, मीच स्टेडियममध्ये गाणं वाजवणाऱ्या महिलेला हे गाणं वाजवण्याची विनंती केली होती.' (Latest sports updates)

keshav maharaj
IND vs AFG 1st T20I: रोहित- विराटचं कमबॅक तर प्रमुख फलंदाज बाहेर! पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

याबाबत बोलताना तो म्हणाला की,'मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त आहे; त्यामुळे मी मैदानात आल्यावर जेव्हा राम सिया राम गाणं वाजते तेव्हा फार प्रसन्न वाटते आणि खेळायला वेगळी ऊर्जा मिळते; कारण माझ्यासाठी देवाचे आशीर्वाद सर्वांत महत्त्वाचे आहेत. आपला धर्म आणि आपल्या संस्कृतीचा आदर करणे फार महत्त्वाचे असते.'

keshav maharaj
IND vs AFG 1st T20I: रोहित- विराटचं कमबॅक तर प्रमुख फलंदाज बाहेर! पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

केशव महाराज डर्बन सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करतोय. या संघाबद्दल प्रश्व विचारला असता तो म्हणाला की, 'आमच्याकडे एक संतुलित संघ आहे. संघातील खेळाडू दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com