Pakistani Actors in India: पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांत करता येणार काम, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळत दिला महत्वपूर्ण निर्णय...

Pakistani Actors News: २०१६मध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती, जी आता हटवण्यात आली आहे.
Pakistani Actors Work In India
Pakistani Actors Work In Indiasaam tv
Published On

Pakistani Actors Work In India

भारत आणि पाकिस्तानमधले नाते जितके मैत्रीपूर्ण आहेत, तितकेच शत्रुत्वाचे नाते आहेत. २०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका सिनेकर्मीने दाखल केली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी आलेल्या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Pakistani Actors Work In India
Leo Day 2 Collection: थलापतीच्या ‘लियो’ची दोनच दिवसात सेंच्युरी, बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

माहिरा खान, फवाद खान आणि अली जफरसह अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींना भारतामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अलीकडेच मुंबई हायकोर्टाने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणारे प्रॉडक्शन हाऊस आणि गटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी कलाकारांचा भारतामध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळताना सांगितले की, “देशभक्ती ही देशावर असलेल्या भक्तीमध्ये आहे, त्याचा अर्थ दुसऱ्याशी शत्रुत्व करणे असा होत नाही.” न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे फवाद खान, अली जफर, माहिरा खान, सबा कमरसह अनेक लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम करायला मिळणार आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पी पुनीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Pakistani Actors Work In India
Sshort And Ssweet Official Trailer: अनोख्या कुटुंबाची विलक्षण कथा, ‘शॅार्ट ॲण्ड स्वीट’चा ट्रेलर प्रदर्शित

याचिका फेटाळताना दोन्ही न्यायाधीशांनी याचिकेमध्ये काही त्रुटी असल्याचे सांगितले. पुनीवाला यांनी सांगितले की, या याचिकेमध्ये योग्यता नाही, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. बॉम्बे हायकोर्टाने पुढे सांगितले की, हा निर्णय एक दिलासा देणारा असून यामुळे सांस्कृतिक सलोखा, एकता आणि शांततेत वाढ होईल.

Pakistani Actors Work In India
Anil Kapoor Instagram: अनिल कपूरने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट केल्या डिलीट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com