लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘लियो’ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपट गुरूवारी अर्थात १९ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाला दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सध्या सर्वत्र चित्रपटाची चर्चा होत असताना नुकताच दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, विजय थलापतीच्या ‘लियो’ने पहिल्या दिवशी १४८.५ कोटींचे जागतिक कलेक्शन केले आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी एकट्या भारतात अंदाजे ६४.८० कोटींची कमाई केली आहे. तर सॅकनिल्कच्या अहवालानुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने भारतात ३६ कोटी कमावले. तर महत्वाची गोष्ट म्हणजे, तामिळ चित्रपट पाहण्यासाठी ६६% थिएटर हाऊसफुल्ल होता. वर्ल्ड वाईडसह देशातही दोन दिवसातच चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठल्यामुळे चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे.
चित्रपटाला दक्षिणात्य भारतात चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रेदश, तेलंगणा या राज्यांमध्ये चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाची कमाई फार कमी आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाईन लिक झाला होता.
Movierulz, Filmyzilla, Tamil Rockers, Telegram आणि 123 Movies या ऑनलाईन साईड्सवर चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध झाला होता. चित्रपट ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फटका कमाईवर बसेल, अशी शंका होती. पण जरीही असं असलं तरी, सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगलीच कमाई करीत आहे.
‘लिओ’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा रत्नाकुमार आणि धीरज वैद्य यांनी लिहिली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, मायस्किन, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद आणि सँडी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘लिओ’ चित्रपटाची निर्मिती सेव्हन स्क्रीन स्टुडिओने केली असून अनिरुद्ध रविचंदरने संगीत दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.