Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रा फेम शिवाली परब म्हणतेय 'म्याड केलंस तू'; चाहते म्हणतात, आता हे काय नवीन?

Viral Video Song:सोशल मीडियावर शिवली आणि विशाल राठोड यांचे नवीन कोरे मराठी गाणे "म्याड केलंय तू" प्रदर्शित झालं आहे.
Shivali Parab New Video Song
Shivali Parab New Video SongInstagram @parabshivali

Shivali Parab New Video Song: कॉमेडीची हास्यजत्रा या विनोदी मालिकेतून शिवाली परब घराघरात पोचली. कल्याणच्या या चुलबुलीने तिच्या अभिनयाने अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवाली तिच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत अली होती. आता शिवली पुन्हा एकदा तिच्या नवीन कामामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर शिवली आणि विशाल राठोड यांचे नवीन कोरे मराठी गाणे "म्याड केलंय तू" प्रदर्शित झालं आहे. हे गाणे प्रदर्शित होताच व्हायरल देखील झालर आहे. तांड्यातील मुलगा या नव्याकोऱ्या गाण्यात धुमाकूळ घालतोय. आणि त्यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबला पाहणं रंजक ठरतंय.

Shivali Parab New Video Song
सनम पुरी झाला Engaged; फॅशन आयकॉन Zuchobeni Tungoeशी लवकरच अडकणार विवाहबंधनात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसोबत विशाल राठोड सोबत या गाण्यात झळकणार असून व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित होणार आहे. 'म्याड केलंस तू' म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम सॉंग रसिकांच्या हृदयाचा ठोका ठोका चुकवणार आहे. १२ मार्चला गाण्याचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून गाण्याची चर्चा होती. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून हे गाण प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

या गाण्यातील शिवालीचे एक्सपेशन खूप कमाल आहे. खूप सुंदर स्टोरी या गाण्यातून मांडण्यात आले आहे. या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण आऊटडोअर झाले आहे. तर विशालन तेदेखील या गाण्यात उत्तम डान्स केला आहे.

या लव्हेबल प्रेमकहाणीला सागर जनार्दन याने संगीत दिलंय. तर या गाण्याला सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या रोमँटिक गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केल आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष महाजनने केले आहे. गाण्याचे छायाचित्रण सूरज राजपूतने केले आहे. सीएम राठोड यांनी गाण्याची निर्मिती केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com