Genelia Deshmukh: विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाजपची भाषा; रितेशनंतर बायको जेनेलियाची खास पोस्ट

Genelia Deshmukh: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक वादग्रस्त घडामोडी समोर आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे.
Genelia Deshmukh
Genelia DeshmukhSaam tv
Published On

Riteish Deshmukh: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक वादग्रस्त घडामोडी समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील एका प्रचारसभेत दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी जोरदार टिका केली असून ही रितेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनिलीया देशमुखने देखील हा व्हिडिओ रि-शेअर केला आहे.

वक्तव्यामुळे वाढले राजकीय वाद

भाजपने आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी, “लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील.” असे वक्तव्य करत मतदारांना उद्देशून विधान केले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेस आणि विरोधकांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.

Genelia Deshmukh
Oscar 2026: भारताचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? करण जोहरचा 'होमबाउंड'ची टॉप १५ मध्ये एन्ट्री
Genelia Deshmukh
Genelia Deshmukh

या विधानावर काँग्रेसचे नेते आणि विलासराव देशमुखांचे सुपुत्र अमित देशमुख यांनी सांगितले की, अशा वक्त्यांनी स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या असून हे विधान अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहे.

Genelia Deshmukh
Tuzya Sobatine: 'स्टार प्रवाह'च्या नव्या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख बदलली! या दिवशी प्रसारित होणार पहिला एपिसोड

रितेश देशमुखचा व्हिडीओ

या वादग्रस्त विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी हात जोडून सांगितले की “मी दोन्ही हात वर करून सांगतो की, लोकांसाठी जे माणूस जगली, त्यांची नावे लोकांच्या मनात कोरलेली असतात लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं पुसता येत नाही.” असे मत व्यक्त करत वडिलांच्या स्मृतींना पुसण्याचा दावा निराधार असल्याचे स्पष्ट केले.

रितेश देशमुखचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आता जेनिलियाने देखील हा व्हिडीओ पुन्हा शेअर करत पाठिंबा दिला आहे. अनेकांनी त्यांच्या भावना आणि विचारांचे समर्थन केले आहे. या विधानामुळे वाद वाढल्यावर रवींद्र चव्हाण यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की हे विधान राजकीय हेतूने केलेले नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com